शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात २६ मेंढ्यांचा मृत्यू; अडीच ते तीन लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 13:48 IST

शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी...

दहिटणे (ता.दौंड): येथील शिंदेमळा परिसरातील मेंढपाळांच्या पालावर भरदिवसा बिबट्याने बेधडक हल्ला चढवून सुमारे २६ मेंढ्यांचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून बिबट्याच्या बंदोबस्ताबरोबरच नुकसान भरपाईची मागणी मेंढपाळ संपत सोमनाथ थोरात यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दहिटणे गावानजीक असलेल्या शिंदेमळा येथे मेंढपाळ संपत सोमनाथ थोरात व नवनाथ यशवंत बोरकर यांचा वाडा शेतकरी दिगंबर मगर यांच्या शेतात मुक्कामी होता. मेंढपाळ बकऱ्यांना चारा चारण्यासाठी घेऊन इतर ठिकाणी गेले असता शुक्रवार (दि.२७) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मेंढपाळ यशवंत बोरकर यांंची अकरा तर संपत सोमनाथ थोरात यांंची पंधरा बकरी यांच्यावर हल्ला चढवला.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकूण सव्वीस बकरी व लहान पिल्ले जागीच ठार झाले आहेत. घटनेचा पंचनामा यवत वनपाल गणेश पवार, वनरक्षक शिवकुमार बोंबले, विलास होले, वन कर्मचारी सहकारी यांनी केला आहे. यावेळी सरपंच दादासाहेब कोळपे, मिरवडीचे सरपंच सागर शेलार यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठीच्या उपाययोजना तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी वन खात्याकडे केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdaund-acदौंड