शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूच्या विकारासाठी २५ हजार रुपये देणार - विश्वास देवकाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:28 IST

जिल्हा परिषदेने महाआरोग्य शिबिरे सुरू केली आहेत. त्यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठीदेखील तपासणी शिबिर सुरू आहेत. आता मेंदूच्या विकारासाठी देत असलेले १५ हजार रुपये उपचारांसाठी कमी पडतात म्हणून २५ हजार रुपयांची मदत देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली.

बारामती - जिल्हा परिषदेने महाआरोग्य शिबिरे सुरू केली आहेत. त्यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठीदेखील तपासणी शिबिर सुरू आहेत. आता मेंदूच्या विकारासाठी देत असलेले १५ हजार रुपये उपचारांसाठी कमी पडतात म्हणून २५ हजार रुपयांची मदत देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली.जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या सहकार्याने बारामती येथील महिला रुग्णालयात आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन देवकाते यांनी केले. ते म्हणाले की, बारामतीत मागील महाआरोग्य शिबिरात तीन हजारांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्या. मागील वर्षी २३ हजार रुग्ण तपासण्यात आले. शिबिराचे नियोजन उत्कृष्ट होत असल्यामुळे रुग्णांचाही मोठा प्रतिसाद मिळात आहे.जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने म्हणाले की, मागील वर्षी ५६ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यंदा जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरांमध्ये सहा तालुक्यांत आतापर्यंत २६ हजार रुग्णांची तपासणी झालेली आहे. तसेच, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कॅन्सरमुक्त अभियान सुरु आहे. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या वेळी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, पंचायत सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, मीनाक्षी तावरे, रोहिणी तावरे, अभिजित तांबिले, संदीप जगताप, संभाजी होळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन धनवान वदक यांनी केले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.शिबिरात १६,५०० रुग्णांची तपासणीबारामती : बारामती एमआयडीसीतील महिला रुग्णालयात महाआरोग्य शिबिरात रुग्णांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी(दि. १२) राज्यातून १२९ दवाखान्यांमधील ४५० हून अधिक डॉक्टरांनी तालुक्यातील १६ हजार ५०० रुग्णांची तपासणी व उपचार केले. या शिबिरात मुंबई, पुण्यासह, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील ३६ मोठ्या खासगी मल्टीस्पेशालिटी दवाखान्यांसह १२९ दवाखाने सहभागी झाले होते.बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात झालेल्या या शिबिरात नियोजनामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनदेखील गर्दी न होता रुग्णांची तपासणी व्यवस्थित झाली. या शिबिरासाठी रुग्णालयाबाहेर एकाच वेळी १०० रुग्णांची काही क्षणात नोंदणी होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. बारामतीतील तुळजाराम चतुरचंद, विद्या प्रतिष्ठान व शारदानगरच्या शैक्षणिक संकुलांमधील विद्यार्थ्यांनी यामध्ये स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडली. रुग्णांसाठी बारामती तालुक्यातील गावागावातून बसची व्यवस्था करण्यात आली होती. छत्रपती, सोमेश्वर व बारामती अ‍ॅग्रो कारखान्यांनी सोय केली होती. बारामती शहरातील रुग्णांसाठी रिक्षा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती.अनेक रुग्णालयांचा उत्स्फूर्त सहभागया शिबिरात मुंबई, पुण्यासह बारामती शहरातील बहुतेक सर्व दवाखाने अशा एकूण खासगी ३६ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांसह पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील तज्ज्ञ, विविध संघटनांनीही या शिबीरासाठी हातभार लावला. रुग्णांसाठी राज्यभरातून मदतीचे हात सरसावले होते. रुग्णांसाठी दानशूरांकडून केळी व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य