शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

शहरालगतची ‘ती’ २४ गावं कात्रीत!

By admin | Updated: December 7, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद पाणी देईना; महापालिकेकडून वसुलीसाठी तगादा... लोकसंख्या लाखोंच्या आसपास गेल्याने ग्रामपंचायतींना डोलारा झेपेना... अशा कात्रीत जिल्ह्यातील ‘ती’ २४ गावं अडकली आहेत

पुणे : जिल्हा परिषद पाणी देईना; महापालिकेकडून वसुलीसाठी तगादा... लोकसंख्या लाखोंच्या आसपास गेल्याने ग्रामपंचायतींना डोलारा झेपेना... अशा कात्रीत जिल्ह्यातील ‘ती’ २४ गावं अडकली आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला आम्हाला तुमच्यातून आता वगळाच, अशी मागणी केली असून, मुख्यमंत्र्यांना साकडे घालत अंतिम आदेश काढून महापालिकेत घ्या, अशी मागणी केली आहे. १९९७ मध्ये सरकारने पुण्याच्या आसपासच्या ३४ गावांचा समावेश पालिका हद्दीत केला. यातील काही गावांमधून पालिका नको, अशी मागणी सुरू झाली. त्यामुळे २००१ मध्ये राज्य सरकारने विशेष आदेश काढून मांजरी, मुंढवा (केशवनगर), उंड्री, पिसोळी, साडेसतरा नळी, लोहगाव, शिवणे, बावधन, सूस आदी २४ गावे पालिका हद्दीतून वगळली.गावे वगळली असली, तरी तिथे पालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा सुरूच राहिला. सलग १५ वर्षे या २४ गावांना पालिका पाणीपुरवठा करीत आहे. यापोेटी या ग्रामपंचायतींकडे सुमारे २० कोटींपर्यंत थकबाकी राहिली आहे. आता महापालिका पाणीपट्टी भरा, नाहीतर पाणी तोडतो, अशी धमकी देत आहे. शासनाने काढलेला एक आदेश पुढे करीत जिल्हा परिषद या गावांत कोणतीही नवीन योजना देण्यास तयार होत नाही. गेल्या आठ महिन्यांत न्यायालयाच्या आदेशानुसार करवसुली बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायती अडचणीत आहेत. कचरा गाड्यांना डिझेल भरण्यापुरतेही पैैसे त्यांच्याकडे नाहीत. महापालिका पाणी पुरवते; मग त्यांना पाणीपट्टी दिली पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे; पण आमच्या तिजोरीतच खडखडाट आहे, तर पैैसे कुठून देणार? असा या गावांचा प्रश्न आहे. या सर्व ग्रामपंचायती शहरालगतच्या असून, तेथील लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहोचली आहे. फुरसुंगीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तर २ लाखांपर्र्यंत गेली आहे. आता इतक्या मोठ्या लोकसंख्येचा डोलारा या गावांना पेलवत नाही. तेथे पाणी, कचरा, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर झाला आहे. तेथे बकालपणा वाढत आहे. त्यामुळे शासनाने या गावांचा विचार करून त्यांना महापालिकेत समावेश करून घेणे गरजेचे आहे. या गावांची स्थिती ना इकडेचे ना तिकडचे झाली आहे. शासनाच्या आदेशाला बांधील राहत जिल्हा परिषदेने नव्या योजना नाकारल्याने या गावांना त्राता कोणी उरला नाही. त्यामुळे या गावांनी महानगरपालिकेत सामील करण्याची मागणी केली.