शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेशन ग्राहकांची ई-केवायसी २३ टक्के अपूर्ण; धान्य बंद होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:00 IST

३१ मेची मुदत, वाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडे

पुणे : शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आता ३१ मे रोजी संपणार असून आतापर्यंत राज्यात ७७टक्केच जणांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे २३ टक्के ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ मेनंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारचा असल्याने मुदतवाढीबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत. परिणामी, अशांना धान्य मिळणार नाही, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

दोनदा मुदतवाढ देऊनही काम राहिले अपूर्णच

ई-केवायसी पूर्ण होत नसल्याने ३१ एप्रिल आणि ३१ मे अशी दोनवेळी सरकारने मुदतवाढ देण्यात आली. तरीही अजून सुमारे २७ टक्के ग्राहकांनी ई-केवायसी केली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत.

अहवाल सांगतो : राज्यात ३० मेच्या अहवालानुसार, रेशन ग्राहकांची एकूण संख्या ६ कोटी ८५ लाख ३६ हजार ५५० इतकी आहे. त्यातील ५ कोटी २६ लाख ६३ हजार ४६६ ग्राहकांनी (७६.८४ टक्के) ई-केवायसी पूर्ण केले आहे, तर अजूनही १ कोटी ७७ लाख १ हजार ५४९ ग्राहकांचे (२३.१६) ई-केवायसी प्रलंबित आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार