पुणे - गिरीप्रेमी यांच्या वतीने ‘कांचनगंगा इको एक्स्पेडिशन २०१९’ च्या निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला सर्वाधिक २२ वेळा एव्हरेस्ट चढाई करणारे कामी रिटा शेर्पा हे पुण्यामध्ये उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मोहिमेचे नेते व ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी उषाप्रभा पागे, चंदन चव्हाण, विवेक शिवटे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम कन्नड संघ सभागृह, डॉ. कलमाडी शामराव प्रशाला एरंडवणे येथे मंगळवारी (दि. १७) ६.३० वाजता संपन्न होणार आहे. तसेच १४ अष्टहजारी शिखरांवर चढाई केलेले नेपाळचे पहिले मिंग्मा शेर्पा, एव्हरेस्ट शिखरवीर व दार्जिलिंग येथील हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य देविदत्ता पांडा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या कार्यक्रमाला विक्रमवीर शेर्पांच्या समवेत पुण्याच्या पहिल्या नागरिक महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, एमसीसीआयए संचालक मंडळाचे प्रमुख डॉ. अनंत सरदेशमुख, हावरे बिल्डर्स व इंजिनिअर्स कार्यकारी संचालक व साई संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे आदी उपस्थित असणार आहे.
२२ वेळा एव्हरेस्ट सर केलेले कामी शेर्पा पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 03:01 IST