कुकडी प्रकल्पांतर्गत धरणामध्ये २१.६६ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:17+5:302021-09-15T04:13:17+5:30

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून पाऊस सुरू असल्याने वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी आणि डिंभा ...

21.66 TMC water storage in the dam under Kukdi project | कुकडी प्रकल्पांतर्गत धरणामध्ये २१.६६ टीएमसी पाणीसाठा

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणामध्ये २१.६६ टीएमसी पाणीसाठा

googlenewsNext

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून पाऊस सुरू असल्याने वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी आणि डिंभा धरणामध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या धरणांपैकी आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून दुपारी ३ वाजता ३००० क्युसेक वेगाने विसर्ग, तर सायंकाळी ७ वाजता ६७२० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच याच धरणातून डिंभे डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक वेगाने आणि डिंभे उजव्या कालव्यातून ५० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे . त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील वडज धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून मीना नदीत १७१२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे .

जुन्नर तालुक्यातील पाच धरणांचा उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी तसेच झालेल्या पावसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे –

येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा ११४४ द.ल.घ.फूट ( ५८.८४ % ) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ४५८ मि.मी.पाऊस झालेला आहे.

माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा ५४९१ ( ५३.९५ % ) धरणाच्या द.ल.घ.फूट पाणीसाठा उपलब्ध आहे, पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ७२१ मि.मी.पाऊस झालेला असून २४ तासांत १८ मि.मी.पाऊस झालेला आहे.

वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये उपयुक्त पाणीसाठा ११७४ द.ल.घ.फूट ( १०० % ) झाला असून या धरणातून येडगाव धरणात १५४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ४५१ मि.मी.पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे. २४ तासांत १२ मि.मी.पाऊस झालेला आहे.

पिंपळगाव जोगा धरणाच्या क्षेत्रामध्ये १७७३ द.ल.घ.फूट ( ४५.५७ % ) पाणीसाठा उपलब्ध झाला असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ०१ जूनपासून आजअखेर ६६९ मि.मी.पाऊस झालेला आहे. २४ तासांत १२ मि.मी.पाऊस झालेला आहे.

आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात १२४९५ द.ल.घ.फूट ( १०० % ) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ८५७ मि.मी.पाऊस झालेला आहे. २४ तासांत १५ मि.मी.पाऊस झालेला आहे अशी माहिती कार्यकरी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

चिल्हेवाडी धरणाच्या क्षेत्रामध्ये ७४१ द.ल.घ.फूट ( ९६.३५ % ) पाणीसाठा उपलब्ध झाला असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ०१ जूनपासून आजअखेर ३३१ मि.मी.पाऊस झालेला आहे. २४ तासांत ४ मि.मी.पाऊस झालेला आहे. आजमितीला पाच धरणांमध्ये २२ हजार ७७ द.श.घ.फूट (७४.३९ टक्के) उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध आहे. मागील २१ हजार ५२५ द.श.घ.फूट ( ७२.५३ टक्के) उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध होता.

Web Title: 21.66 TMC water storage in the dam under Kukdi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.