शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अाई वडिलांना एवढंच कळालं की मी साहेब झालाे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:40 IST

पालघर जिल्ह्यातील अादिवासी भागात राहणारा कल्पेश जाधव हा एमपीएससी परीक्षा पास झाला असून अाता ताे राज्य शासनाच्या काैशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजु हाेणार अाहे.

पुणे  : दाेन वर्षापूर्वी मी क्लास वन अाॅफिसर हाेईल असं वाटलं नव्हतं. मनात जिद्द हाेती, स्वतःला सिद्ध करायचं हाेतं. त्यामुळे अाज एमपीएससी परीक्षा पास झाल्याचा अत्यंत अानंद अाहे. माझे अाई-वडिल निरक्षर अाहेत, ते मजुरी करतात. त्यांना स्पर्धा परीक्षांबाबत काही माहित नाही. त्यांना मी सकाळी फाेन करुन मी एमपीएससी पास झाल्याचं सांगितल्यानतंर त्यांना अापला मुलगा काेणीतरी माेठा साहेब झाला अाहे इतकंच कळालं. एमपीएससीची परीक्षा पास झालेला कल्पेश जाधव त्याची कहाणी सांगत हाेता.  कल्पेशची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी अाहे. ताे अवघ्या 21 व्या वर्षी क्लास वन अाॅफिसर झाला अाहे. 

    पालघर जिल्ह्यातल्या एका अादिवासी भागात कल्पेशचे गाव अाहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच. अाई-वडिल दाेघेही निरक्षर. माेलमजुरी करुन अापला संसार चालवतात. कल्पेशचा माेठा भाऊ काॅन्स्टेबल अाहे. कल्पेश एमपीएससी पास झाल्याचा त्याला खूप अानंद झाला. अाई-वडिल निरक्षर असल्यामुळे अापला मुलगा एमपीएससी पास झाला म्हणजे नेमकं ताे अाता काय काम करणार हे त्याच्या अाई वडिलांना माहित नाही. अापला मुलगा साहेब झाला हेच ते अाता गावात सांगतायेत. कल्पेशने कल्याण मधल्या बिर्ला महाविद्यालयातून बीएस्सी पूर्ण केले अाहे. महाविद्यालयात असताना त्याला एमपीएससी बद्दल माहिती मिळाली. तेव्हापासूनच त्याने तयारी सुरु केली हाेती. परिस्थीती तशी बेताचीच असल्याने काेणताही क्लास लावणे किंवा काेणाचे मार्गदर्शन घेणे त्याला शक्य नव्हते. महाविद्यालय सांभाळून ताे दिवसातले सात ते अाठ तास अभ्यास करत हाेता. या कष्टाचे अाता चिझ झाल्याचे कल्पेश म्हणताे. एमपीएससीची मुख्य परीक्षा दिल्यानंतर कल्पेश पुण्यात अाला. पुण्यात त्याने मुलाखतीचे मार्गदर्शन घेतले. कल्पेश अाता राज्य शासनाच्या काैशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजु हाेत अाहे. 

    अापल्या यशाबाबत बाेलताना कल्पेश म्हणाला, दाेन वर्षापूर्वी मी क्लास वन अधिकारी हाेईल असे वाटले नव्हते. माझे स्वप्न अाज सत्यात उतरले अाहे. अापल्या कष्टाचे चिझ झाल्याचा खूप अानंद अाहे. माझ्या अाई-वडिलांना तसेच भावाला मी अाज सकाळी ही अानंदाची बातमी कळवली. त्यांनाही खूप अानंद झाला अाहे. अामचे गाव अादिवासी भागात अाहे. अामच्या गावात पदवी शिक्षण पूर्ण केलला मी दुसरा-तिसराच असेल. त्यामुळे अामच्या गावातही अानंदाचे वातावरण अाहे. 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीpalgharपालघर