शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कुकडी प्रकल्पात २१ टक्के साठा, पाणीसाठा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:43 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून आजमितीस या प्रकल्पात केवळ ६.५३३ टीएमसी म्हणजेच २१.३९ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात २.४६५ टीएमसी म्हणजे केवळ ८.०७ टक्केएवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक होता.

डिंभे - कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून आजमितीस या प्रकल्पात केवळ ६.५३३ टीएमसी म्हणजेच २१.३९ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात २.४६५ टीएमसी म्हणजे केवळ ८.०७ टक्केएवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा हा दुपटीने जास्त आहे, असे असले तरी उन्हाळी आवर्तनामुळे हा पाणीसाठा झपाट्याने घटणार आहे.जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार होतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण सात तालुक्यांमधील सुमारे १,५६,२७८ एवढे मोठे क्षेत्र कालव्यांद्वारे सिंचनाखाली आले आहे. सर्वत्र बागायती पिके घेतली जाऊ लागल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागताच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांकडून होऊ लागली आहे. मात्र कुकडी प्रकल्पाची यंदाची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत बरी असली तरी अजून उन्हाळी आवर्तन सोडणे बाकी आहे.खरिपासाठी एक, तर रब्बीसाठी दोन आवर्तने सोडली आहेत. उन्हाळी आवर्तन सुरू होताच प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने खाली जाणार आहे. या प्रकल्पातील डिंभे धरणातच सध्या सर्वाधिक पाणीसाठा असला तरी या धरणाच्या उजव्या कालव्यातून १८० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. प्रकल्पात येणाºया पाच धरणांपैकी येडगाव धरणात आजमितीस ६०.४० टक्के पाणीसाठा शिल्लक दिसत आहे. याचे कारण उन्हाळी आवर्तनासाठी या धरणात पाणीसाठा केला जात आहे. मात्र या धरणाचा उपयुक्त पाणीसाठा कमी आहे.यंदा या प्रकल्पांतर्गत येणाºया धरणांतून रब्बीसाठी २, खरिपासाठी दोन रोटेशन पूर्ण झाली आहेत. यामुळे आज जरी कुकडी प्रकल्पात २१.३९ टक्केएवढा पाणीसाठा दिसत असला तरी वाढत्या उन्हाची तीव्रता व पाण्याच्या मागणीमुळे प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची गरज लागणार आहे. डिंभेच्या पाण्यावरच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सध्या या धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने या धरणातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे.आदिवासी गावांची वणवण सुरू होईलप्रकल्पातून उन्हाळी रोटेशन सुरू झाल्यास पाणलोटाच्या आतील आदिवासी गावांना पाण्याच्या या पळवापळवीचा फटका बसणार आहे. सध्या जरी थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असला तरी मे महिन्याच्या अखेरीस या भागात असणाºया पाणी योजना अडचणीत येणार असल्याने पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांना यंदाही कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची चिन्हे आहेत.येडगावसाठवण क्षमता ३.३ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात केवळ १.६९१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.माणिकडोहसाठवण क्षमता १०.८८ टीएमसी एवढी आहे. सध्या या धरणात ०.९३० टीएमसी म्हनजेच ९.१४ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे.वडजसाठवण क्षमता १.२७१ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात ०.२०३ टीएमसी म्हणजेच १७.४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.पिंपळगाव जोगासाठवण क्षमता ७.६८७ टीएमसी एवढी आसून आजतागायत या धरणात ०.५५६ टीएमसी म्हणजेच १४.२८ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे.डिंभे१३.५०० एवढी साठवण क्षमता असून आजमितीस या धरणात ३.१५२ टीएमसी म्हणजेच २५.२२ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे.५ धरणे मिळून कुकडी प्रकल्पात ६.५३३ टीएमसी म्हणजेच २१.३९ टक्के एवढा एकूण साठा शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे