शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

साडे तीन कोटींच्या प्रकल्पासाठी २१ कोटींचा चुराडाच; ‘ई-लर्निंग’ वादाच्या भोवर्‍यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:37 IST

ई-लर्निंग अंमलबजावणी साडे तीन कोटीमध्ये करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना देण्यात आला होता. मात्र त्याऐवजी या प्रकल्पांसाठी २१ कोटी रूपयांचा आराखड्याला प्रशासनाकडून स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देसजग नागरिक मंचच्यावतीने ई-लर्निंगबाबत खुलासा करण्याची मागणीमहापालिका आयुक्त कुणाल कुमार व स्थायी समितीचे अध्यक्ष मुरधीधर मोहोळ यांना निवेदन

पुणे : महापालिकेच्यावतीने २१ कोटी रूपये खर्च करून पालिकेच्या २८७ शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प राबविण्याची योजना चांगलीच वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या योजनेची अंमलबजावणी साडे तीन कोटीमध्ये करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना देण्यात आला होता. मात्र त्याऐवजी या प्रकल्पांसाठी २१ कोटी रूपयांचा आराखड्याला प्रशासनाकडून स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली आहे. आयुक्तांनी साडे तीन कोटींऐवजी २१ कोटींचा प्रस्ताव का स्वीकारला याचा खुलासा करावा अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली आहे.महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार व स्थायी समितीचे अध्यक्ष मुरधीधर मोहोळ यांना सजग नागरिक मंचच्यावतीने निवेदन देऊन ई-लर्निंगवर कोट्यवधी रूपयांचा चुराडा का करण्यात येत आहे, याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे. साडे तीन कोटी रूपयांमध्ये होणार्‍या योजनेसाठी २१ कोटी रूपये खर्च करण्याचा घाट का घालण्यात आला आहे अशी विचारणा विवेक वेलणकर व विश्वास सहस्त्रबुध्दे यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिका प्रशासनाकडून २८७ शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उभी करून ई-लर्निंगचे शिक्षण देण्याची योजना प्रस्तावित केली आहे. पालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ई क्लास एज्युकेशन सिस्टिम या संस्थेकडून ८४९ एलईडी, डिजिटल अभ्यासक्रम यांची खरेदी करण्यात आली. सध्या पालिकेकडे ८६१ एलईडी, २८१ संगणक, २८७ प्रोजेक्टर उपलब्ध आहेत. आता केवळ कॅमेरा व इतर सामुग्री खरेदी करावयाची आहे. त्यासाठी साडे तीन कोटी रूपयांचा खर्च केल्यास पालिका शाळातील मुलांना चांगल्या पध्दतीने ई-लर्निंगचे शिक्षण देता येईल असे सादरीकरण आयुक्तांपुढे करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकार्‍यांनी याचे कौतुक केले होते. मात्र अचानक साडे तीन कोटी रूपयांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकणार्‍या या योजनेसाठी २१ कोटी रूपयांची मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे ई-लर्निंगवर कोट्यवधी रूपयांचा वाढीव खर्च का करण्यात येत आहे याची विचारणा करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तeducationशैक्षणिक