शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

पुणे पोलीस आयुक्तांचा दणका, कुख्यात गुंडांची घेतली परेड; Insta Reel टाकाल तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 17:31 IST

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कॉल करून त्यांच्याकडून पुणे पोलिसांनी फॉर्म भरून घेतला.

पुणे - Pune Police Commissioner took out the gangster's parade ( Marathi News ) पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात चार्ज घेताच कुख्यात गुंडांना चांगलाच दणका दिला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी आज २००-३०० कुख्यात गुंडांची ओळख परेड घेतली. त्यावेळी गजा मारणेसह सर्व गुंड रांगेत उभे होते. याठिकाणी अमितेश कुमार यांनी प्रत्येक टोळीला समज देत सक्त ताकीद दिली. यापुढे इन्स्टाग्रामवर रिल्स टाकली आणि भाईगिरी दाखवली तर सोडणार नाही. आतापर्यंत जे काही गुन्हे नोंद असतील मात्र यापुढे अशी कृत्य केल्यास सोडणार नाही असं अमितेश कुमार यांनी बजावलं. 

पुणे पोलीस आयुक्तालयात दोन रांगेत गुंड उभे केले होते. त्यात एका बाजूला कुख्यात गुंड निलेश घायावळ, गजा मारणे यासह अनेक टोळ्या होत्या तर दुसऱ्या बाजूला काही तरूण जे नुकतेच गुन्हेगारी क्षेत्रात आलेत त्यांना उभे केले होते. अमितेश कुमार यांनी सगळ्या टोळीला सक्त ताकीद दिली. याठिकाणी पोलीस आयुक्तांनी म्हटलं की, यापुढे कुठलाही गुन्हा करायचा नाही. कुठल्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप यावर स्टेटस ठेऊन दादागिरी दाखवायची नाही असं कडक शब्दात सुनावले. 

गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी आम्ही प्लॅनिंग करत आहोत. त्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कॉल करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला. गुन्हेगारी कृत्य करू नये यासाठी खबरदारी म्हणून त्यांच्याकडून कायदेशीर बाजू करून घेतल्या आहेत. २६७ रेकॉर्डवरचे गुन्हेगार याठिकाणी बोलावले होते. हा आमचा पूर्वीचा प्लॅन ठरला होता. त्यानुसार त्यांना सूचना दिल्या आहेत. रिल्समार्फत आपण गेल्यावर्षी २४ गुन्हे दाखल केलेत असं पुणे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली. सध्या गुन्हेगारीची उद्दातीकरण करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. त्यातून नवे गुन्हेगार तयार होतात या प्रकाराला आळा बसावा यासाठी पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली. 

दरम्यान, येथे जमलेल्या सर्व गुन्हेगारांकडून हमीपत्र भरून घेतले त्यात यापुढच्या काळात कुठल्याही गुन्ह्यात मी सहभागी होणार नाही आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी होणार नाही असं लिहून घेण्यात आले. पुण्यातील धनकवडी, कोथरुड, कात्रज यासारख्या अनेक भागातील विविध टोळ्या याठिकाणी आल्या होत्या. पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे या गुंडाच्या ओळख परेडमध्ये नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेला गुंड निलेश घायावळ, पार्थ पवार यांनी ज्याच्या घरी भेट दिली असा गजा मारणे या कुख्यात गुंडाचाही सहभाग होता.

टॅग्स :Policeपोलिस