शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार रुपयांसाठी डोक्यात दगड घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 03:40 IST

कामाचे २ हजार रुपये देण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला

पुणे : कामाचे २ हजार रुपये देण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. हा प्रकार संगमवाडीकडून सादलबाबा चौकाकडे जाणाऱ्या रोडवर ओढ्याच्या पुलाजवळ सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्यापूर्वी घडला.नरसिंगराम बुटाराम गर्ग (वय ३७, रा़ बुधवार पेठ, मूळ राजस्थान) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दुर्गेशनाथ गोपीनाथ गोस्वामी (वय २९, रा़ लोहगाव) याला अटक केली आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले, की नरसिंगराम गर्ग आणि दुर्गेशनाथ गोस्वामी दोघेही सुतारकामाचा व्यवसाय करीत होते. गोस्वामी याच्याकडे गर्ग पूर्वी काम करीत होता़ त्या सुतार कामाचे २ हजार रुपये गोस्वामी याने गर्गला द्यायचे होते. पण तो पैसे देत नव्हता. रविवारी गर्ग याने त्याच्याकडे पुन्हा पैशाची मागणी केली. तेव्हा गोस्वामी मोटारसायकलवरून बुधवार पेठेत गर्गकडे आला़ यावेळी त्याने गर्ग याला १ हजार रुपये दिले. त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून लोहगावकडे जात होते़ सादलबाबा चौकाकडे जाणाºया रोडवर ओढ्यावरील पुलाजवळ ते लघुशंकेसाठी थांबले़ तेव्हा गोस्वामी याने गर्ग याला शिवीगाळ करून लाथ मारून त्याला खाली पाडले़ तेथे असलेल्या सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून त्याचा खून केला़ त्यानंतर तो लोहगावला घरी आला.संगमवाडी येथे एकाची हत्या झाल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. पोलीस कर्मचारी प्रफुल्ल मोरे, प्रवीण भालचिम यांनी गोस्वामी याचे घर गाठले़ त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यानेच गर्गचा खून केल्याची कबुली दिली़ गोस्वामीकडून पोलिसांनी गर्गचे पाकिट, मोबाइल जप्त केले़ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :Murderखून