शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात २ हजार लिटर मद्य; ५९ लाख ९० हजार रुपये जप्त          

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 17:13 IST

मतदारांना खुष करण्यासाठी जिल्ह्यातील मतदार संघात कमी अधिक प्रमाणात मद्याचा आणि पैशाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे१० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आचार संहिता भंग प्रकरणी ७० गुन्हे दाखलजिल्ह्यातील भरारी पथकाची कारवाई

 - राहुल शिंदे           पुणे: लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून मतदारांना खुष करण्यासाठी जिल्ह्यातील चारही मतदार संघात कमी अधिक प्रमाणात मद्याचा आणि पैशाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.मात्र,जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांकडून अवैध मद्यसाठा आणि बेहिशोबी पैशावर कारवाई केली जात आहे. गेल्या पंचवीस दिवसात ५६ लाख ९० हजार ६३० रुपये तर ७ लाख १९ हजार ९०५ रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे.तसेच आचार संहिता भंग केल्या प्रकरणी ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लोकसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.निवडणूकांच्या काळात मतदारांना प्रलोभित करण्यासाठी मद्याचा आणि पैशाचा वापर केला जाऊ शकतो. तसेच शस्त्राचा धाक दाखवून ठराविक उमेदवाराला किंवा पक्षाला मतदान करण्यासाठी मतदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात मद्य, शस्त्र व पैशाचा चूकीच्या गोष्टीसाठी होणारा वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात दिवस रात्र विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर पैसे आणि मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचार संहितेचे पालन हावे,या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.मात्र,आचार संहिता भंग करणा-यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. १० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आचार संहिता भंग प्रकरणी ७० गुन्हे दाखल झाले असून त्यात शिरूर मतदार संघात सर्वाधिक ५६ मावळमध्ये १ पुण्यात ५ तर बारामतीत १ गुन्हा दाखल झाला आहे.त्याचप्रमाणे शिवाजीनगर व वडगावशेरी येथे विना परवाना सभा घेतल्याबद्दल प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.आचारसंहितेच्या काळात शस्त्र बाळगल्याबद्दल भोसरीत एकावर कारवाई करण्यात आली असून या शस्त्राची किंमत ५ लाख ९५ हजार २२० रुपये आहे.तसेच १५० रुपयांची एक तलवार ५० हजार रुपयांचे २ पिस्टल ५००  रुपयांचे ५ काडतुस,एक रॉड ,एक सुरी जप्त करण्यात आली आहे.शस्त्राच्या कारवाईत एक रिक्षा आणि एक पाच लाख रुपये किमतीची चारचाकी मोटारही जप्त केले आहे.अवैध शस्त्रासंबंधी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.......आचार संहिता भंगाचे ७० गुन्हे दाखल, जिल्ह्यातील भरारी पथकाची कारवाईभरारी पथकांने केलेल्या कारवाईत शिरूर लोकसभा मतदार संघात मोठ्याप्रमाणावर मद्य व पैसे जप्त करण्यात आले आहे. त्यात भोसरीत २० लाख रुपये तर जुन्नरमध्ये दोन ठिकाणी २ लाख ५६ हजार आणि १ लाख ७४ हजार ९०० रुपये अशी ४ लाख २४ हजार ९०० रुपये रक्कम जप्त केली.खेडशिवापुर येथील तपासणीत दुचाकीवरून २ लाख २८ हजार १२५ रुपये रक्कम दुचाकीवरून घेवून जाणा-यावर कारवाई करून गुरूवारी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र,ही रक्कम पेट्रोल पंपाची असल्याचे सांगितले जात आहे.पुणे लोकसभा मतदार संघातील कोथरूड येथीन ८ लाख १२ हजार ५०० रुपये, कसबा पेठेतून ९४ हजार ८०० तर पर्वतीतून १ लाख १९ हजार रुपये जप्त करण्यात आले.एकट्या भोसरीत मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत ५४ ठिकाणी अवैधपध्दतीने मद्य बाळगणा-यांवर कारवाई करण्यात आली आहे.त्यात भोसरीत २ हजार ३४५ लिटर मद्य जप्त करण्यात आले असून त्याची किमंत १ लाख ६२ हजार ३५२ एवढी आहे. मद्य बाळगणा-या व्यक्तींकडून पैसेही जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Puneपुणेmaval-pcमावळpune-pcपुणेbaramati-pcबारामतीshirur-pcशिरूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक