शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोरटेवाडी केंद्रावर २ गटांत हाणामारी, निवडणुकीला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 02:41 IST

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, गडदरवाडी या चार ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि. १६) शांततेत मतदान झाले. मात्र, सोरटेवाडी येथे निवडणुकीला गालबोट लागून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, गडदरवाडी या चार ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि. १६) शांततेत मतदान झाले. मात्र, सोरटेवाडी येथे निवडणुकीला गालबोट लागून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी असणारा एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे.बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व मतदान यंत्रणा पोहोचली होती. सोमवारी सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी मतदारांची संख्या जादा आणि एकच मशिन असल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक ते दोन तास मतदारांना ताटकळत बसावे लागले होते. मुरूम, वाणेवाडी, गडदरवाडी व वाघळवाडी या सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. मात्र, सोरटेवाडी येथे मतदानाला गालबोट लागून दुपारी दोन वाजता ३० ते ४० लोकांमध्ये काठ्या आणि दगडांनी तुबळ हाणामारी झाली. गेल्या महिन्यात झालेल्या सोसायटी निवडणुकीचा राग मनात असल्याने ही मारीमारी झाल्याचे बोलले जाते. यामध्ये एक पोलीस क र्मचारी जखमी झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांची एसआरपीएफची तुकडी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी बंदोबस्तात पुन्हा मतदान सुरू झाले. दरम्यान, तहसीलदार हनुमंत पाटील आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली; त्यामुळे मोठा अनर्थ ठळला. सर्वाधिक चुरस ही वाघळवाडी येथील ग्रामपंचायतीत बघायला मिळाली. या ठिकाणी सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ते प्रत्येक मतदारराजाच्या दारात जाऊन मतदान केंद्रावर मतदानासाठी घेऊन येत होते. मुरूम आणि वाणेवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांचे आपल्या स्वत:च्या वाहनातून मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आणि मतदान मतपेटीत बंद झाल्याने उमेदवार आता निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. उद्या (मंगळवारी) बारामती येथील रीक्रिएशन हॉलमध्ये सकाळी आठपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील.

टॅग्स :Puneपुणे