शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ५ कोटी रोजगार निर्मिती करणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:29 IST

व्हिलेज इंडस्ट्रीजच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमध्ये पाच कोटी रोजगार निर्मिती करण्यात येणार असून, या उद्योगाची उलाढाल ५ लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.

पुणे : व्हिलेज इंडस्ट्रीजच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमध्ये पाच कोटी रोजगार निर्मिती करण्यात येणार असून, या उद्योगाची उलाढाल ५ लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्या बाबतचे धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे दिली.शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला गडकरी यांनी भेट दिली. मध आणि त्या पासून केलेल्या विविध पदार्थांची त्यांनी माहिती घेतली. तसेच, मध उत्पादकांशी देखील त्यांनी संवाद साधला. केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. संजीव राय, खादी ग्रामोद्योग आयोगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ या वेळी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, देशासह महाराष्ट्राला समृद्ध समुद्र किनारा आहे. बांबू आणि वन औषधींमधे विक्री वाढू शकते. मत्स्य उत्पादन वाढीसाठी कोचीनला ट्रॉलर तयार केला आहे. त्या माध्यमातून समुद्रात शंभर किलोमीटर अंतरापर्यंत जाता येईल. त्यामुळे मत्स्य उत्पादन वाढेल. सध्या भारतातून २० हजार कोटी रुपयांची आयुर्वेदिक औषधे निर्यात केली जातात. ही निर्यात १ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल. बांबू, मध आणि खादी उत्पादनाला वाव देण्यात येईल.देशातील उद्योगांपैकी सूक्ष्म आणि लघु उद्योगाचा वाटा २९ टक्के आहे. तर, या क्षेत्रातून ४९ टक्के निर्यात केली जाते. जवळपास ११ कोटी रोजगार या क्षेत्राने दिले आहेत. ग्रामीण उद्योगांची सध्याची उलाढाल ७५ हजार कोटी रुपये असून, येत्या पाच वर्षांत ती ५ लाख कोटी रुपये करण्यात येईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याने, आत्महत्या देखील कमी होतील.>विमानातही मधाचा वापर करणारविमानामध्ये देण्यात येणाºया कॉफी अथवा चहामध्ये टाकण्यासाठी साखरेबरोबर मधाचा पर्याय द्यावा यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा करण्यात येईल. मिठाईतदेखील मधाचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मध आणि त्यापासून होणाºया विविध पदार्थांसाठी देशभरात हनी क्लस्टर उभारले जातील. त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी