शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ लाख ७० हजार शेतक-यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:47 IST

सरकारने  शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीला वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात सरकार, प्रशासन आणि शेतकरी या सर्वांच्या बाजूने बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे,त्यामुळे या कर्जमाफीची खरे लाभार्थी आणि अपेक्षार्थी यांची संख्या अजूनतरी खात्रीपूर्वक समोर आलेली नाही. 

ठळक मुद्दे १ लाख ७० हजार ४३० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५७ हजार ८७.०१ लाख कोटी रुपयांची कर्जमाफीपुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ५६ अर्ज जिल्ह्यात दौंड,इंदापूर, शिरूर ,बारामती तालुक्यातील अधिक शेतक-यांनी या योजनेचा लाभ

पुणे: राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयातून २ लाख ९८ हजार ५६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) १ लाख ७० हजार ४३० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५७ हजार ८७.०१ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि खासगी बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ प्राप्त झाला आहे.राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला एक वर्ष पूर्ण होत आहे. आॅनलाईन अर्ज भरून आॅनलाईन पध्दतीनेच कर्जाची रक्कम खात्यामध्ये जमा होत असल्याने त्यात पारदर्शकता आणली जात आहे, असे शासनातर्फे सांगितले जात आहे.मात्र,त्यास विलंब होत असल्याने शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ५६ अर्ज आले होते. त्यांपैकी पीडीसीसी बँकेचे १ लाख ११ हजार थकबाकीदार आणि १ लाख १८ हजार प्रोत्साहनपर लाभार्थी होते, तर व्यावसायिक आणि खासगी बँकांचे ६९ हजार ५६ लाभार्थी होते. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी २ हजार ३० कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली होती. ----------------------जिल्ह्यात दौंड,इंदापूर, शिरूर ,बारामती तालुक्यातील अधिक शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज  प्राप्त झाले होते. त्यापैकी पीडीसीसी बँकेचे १ लाख ११ हजार थकबाकीदार आणि १ लाख १८ हजार प्रोत्साहनपर लाभार्थी होते. त्यातील ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या ५१ हजार ६७१ शेतक-यांना २८ हजार ८१.१२ लाख रुपयांची मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ११ हजार ६४४ शेतकऱ्यांना ११ हजार ५५९ लाख रुपयांची एक वेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट- ओटीएस) कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या १ लाख ७  हजार ११५ शेतकऱ्यांना १७ हजार ४४६.८९ लाख रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ७० हजार ४३० शेतक-यांना ५७ हजार ८७.०१ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे,असे सहकार विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारFarmerशेतकरीbankबँक