शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी गमावले १६ हजार, शाईन डॉट कॉमवर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 01:57 IST

नोकरीसाठी शाईन डॉट कॉमवर बायोडाटा अपलोड केला असता आलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशनसाठी डेबिट कार्डद्वारे ३० रुपये एका तरुणीने भरले.

पुणे : नोकरीसाठी शाईन डॉट कॉमवर बायोडाटा अपलोड केला असता आलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशनसाठी डेबिट कार्डद्वारे ३० रुपये एका तरुणीने भरले़ त्यानंतर या तरुणीच्या बँक खात्यातून चार व्यवहारांद्वारे तब्बल १६ हजार रुपये परस्पर काढण्यात आले़ अशा प्रकारे नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या शेकडो तरुणांना याचा फटका बसला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत चार्टर्ड अकौंटंट असलेल्या तरुणीने माहिती दिली़ त्यांनी शाईन डॉट कॉम या वेबसाईटवर त्यांचा बायोडाटा अपलोड केला होता़ दोन दिवसांनी त्यांना कॉल आला व तुमचे नाव एका बँकेच्या नोकरीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले़ आमच्या ड्युटी शाईन डॉट कॉम या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल़ त्यासाठी ३० रुपये भरावे लागेल, असे सांगण्यात आले़ त्यानुसार त्यांना पाठविलेल्या लिंकवर त्यांनी रजिस्ट्रेशन केले व ३० रुपये डेबिट कार्डद्वारे भरले़ त्यासाठी डिटेल दिले़ त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ४ हजार ९९९, ३ हजार ३०, ४ हजार ९९९ आणि २ हजार ९८० रुपये काढले गेले़ त्यांच्या मोबाईलवर बँकेचा ओटीपी येत होता़ त्यापाठोपाठ पैसे काढल्याचा मेसेज येत होता.याबाबत त्यांनी फोन करून चौकशी केल्यावर तुम्हाला पैसे रिफंड केले जातील, असे सांगण्यात आले़ पण अजूनही पैसे परत करण्यात आले नाही, की त्यांच्या परस्पर त्यांचा डाटा हॅक करून बँक खात्यातून पैसे काढले गेले. उत्तर प्रदेशमधून सर्व कॉलकांतिलाल टेकणे यांनी सांगितले, की अशा प्रकारे शेकडो तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता असून शाईन डॉट कॉमचा डाटा दुसºयाकडे कसा गेला़ याबाबत आम्ही दुसºया नावाने त्यांना फोन करून रजिस्ट्रेशन करण्याचा व नेटबँकिंगद्वारे पैसे भरण्याचा प्रयत्न केला़ पण त्यांनी डेबिट कार्डद्वारेच पैसे भरतात येतात, असे सांगितले़ या कॉलची तपासणी केल्यावर ते सर्व कॉल उत्तर प्रदेशातील असल्याचे समजले़ याबाबत आम्ही बँकेकडेही तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी अलंकार पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे फिर्याद देण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांना तुम्ही सायबर क्राईमशी संपर्क साधा, असे सांगून त्यांची तक्रार घेण्यात आली नसल्याचे या तरुणीने सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी