शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अबब...! हिर्डोशी खोऱ्यात सापडला १६ फुटी अजगर; सर्पमित्रांकडून जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 12:19 IST

तालुक्यातील निसर्गरम्य अशा हिर्डोशी गावातंर्गत असलेल्या धामणदेववाडी येथे शेळी गिळताना अजगर शेतकऱ्यांनी पाहिला. वन विभागाने अजगर पकडून बाहेर न सोडता जवळपासच सोडल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजनावरांच्या कळपातील शेळीवर अजगराने केला हल्लाभारतीय अजगर इंडियन रॉक पायटन या जातीचा सुमारे ५० किलो वजनाचा, १६ फुटी लांब

भोर : तालुक्यातील निसर्गरम्य अशा हिर्डोशी गावातंर्गत असलेल्या धामणदेववाडी येथे शेळी गिळताना अजगर शेतकऱ्यांनी पाहिला. त्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडली. वन विभागाने अजगर पकडून बाहेर न सोडता जवळपासच सोडल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे. महाड-पंढरपूर रोडपासून दोन किलोमीटर उंच डोंगरावर असलेली लहानशा धामणदेववाडीतील ज्ञानोबा गोरे नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी घेऊन जात असताना जनावरांच्या कळपातील शेळीवर अजगराने हल्ला केला. शेळीला वेटोळे मारून गिळत असताना त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थ जमा झाले; मात्र अजगराने बकरीला सोडले नाही. सुमारे ५० किलो वजनाचा आणि १६ फुटी लांब भारतीय अजगर इंडियन रॉक पायटन या जातीचा आहे.अजगराने गिळलेली शेळी बाहेर फेकल्यावर ताहीर शेख, सूरज बल्याळ, उमेश मोरे, सचिन सावंत, विक्रांत डोईफोडे, सुबोध साळुंके, सतीश पारवे, अक्षय जाधव, मंगेश धामुणसे या सर्पमित्रांनी अजगराला कोणतीही इजा न करता लांब अंतरावर नेऊन सोडले. मात्र, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजगराला सोडण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. सर्पमित्रांनीच अजगर बाहेर सोडला. याची कोणतीही पावती किंवा लेखी काही दिलेले नाही. दरम्यान, अजगराच्या भीतीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एक अजगर आढळला होता. 

वन विभागाचे कर्मचारी जंगलात फिरकतच नाहीतमहाड-पंढरपूर रोडवर नीरा-देवघर धरणाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात जंगल असून अनेक प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे संवेदनशील भाग आहे. मात्र, सदरच्या जंगलात वनपाल श्रीमती के. यू. पाटील असून त्या कधीच या भागात येत नाहीत किंवा राहतही नाहीत. नागरिकांशी त्यांचा अजिबातच संपर्क नाही. 

टॅग्स :Puneपुणे