शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांच्या मुलीच्या पोटातील १० किलोंची गाठ काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:34 IST

१५ वर्षांची मुलगी गरोदर असावी, असे पोट वाढलेले, हातात काही रिपोर्ट होते. डॉक्टरांनी काळजीपूर्वक रिपोर्ट पाहून तिला तपासले. पोटात मोठी गाठ असल्याची शक्यता वर्तविली.

ठळक मुद्देमंचर उपजिल्हा रुग्णालय : तब्बल ९ तास शस्त्रक्रिया

मंचर : आदिवासी समाजातील १५ वर्षांच्या गरीब मुलीच्या पोटातील १० किलोंची गाठ तब्बल ९ तास शस्त्रक्रिया करून काढत मंचर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला जीवदान दिले आहे. या मुलीवरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अनु गजू माळी असे या जीवनदान मिळालेल्या मुलीचे नाव आहे. डॉक्टरांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. ही दुर्मिळ शस्त्रक्रिया समजली जात आहे.उपजिल्हा रुग्णालय ‘रुग्णांनी गजबजलेले’ अशीच दुपारची वेळ. डॉ. अंबादास देवमाने आपल्या ओ. पी. डी.मध्ये रुग्ण तपासत होते. समोर एक मध्यमवयीन महिला आपल्या मुलीसोबत तपासणीसाठी उभी होती. डॉ. देवमाने यांनी काय झाले, असे विचारता मध्यमवयीन महिलेने मुलीकडे पाहिले. १५ वर्षांची मुलगी गरोदर असावी, असे पोट वाढलेले, हातात काही रिपोर्ट होते. देवमाने यांनी काळजीपूर्वक रिपोर्ट पाहून तिला तपासले. पोटात मोठी गाठ असल्याची शक्यता वर्तविली. अनेक तपासण्यांची आवश्यकता असल्याचे सांगून पुढील तपासणी व उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.महिला निमूटपणे मुलीला घेऊन बाहेर आली, पण तिच्या डोळयात पाणी आले होते. क्षणभर देवमानेही स्तब्ध झाले, पण काय करावे हा प्रश्न समोर होता. याचवेळी डॉ. गणेश पवार यांनी त्या महिलेला पाहिले. चौकशी केली तेव्हा महिलेने सांगितले, की मुलीला घेऊन खूप दवाखाने फिरले. पण हिच्या आजारावर काही इलाज झाला नाही.  आशेने मी येथे आले; परंतु, हिचे आॅपरेशन मोठ्या रुग्णालयात करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण मी हिला घेऊन कोठेही जाणार नाही. माझी मुलगी आणि तिचे नशीब असे म्हणून ती महिला रडायला लागली. डॉ. पवार यांनी डॉ. देवमाने यांच्याशी चर्चा केली. लवकर उपचार नाही केले तर मुलीच्या जीवाला धोका होता. डॉ. पवारांनी डॉ. देवमाने यांना विचारले, की तुम्ही आॅपरेशन करू शकाल. डॉ. देवमाने यांनीही लागलीच होकार दिला. पण तपासण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांच्याशी चर्चा केली. रुग्णास अ‍ॅडमिट करण्यात आले. अनेक अडचणी समोर होत्या. तपासणी करून रोगनिदान करणे, रुग्णांची शस्त्रक्रियेपूर्वीची तपासणी करणे गरजेचे होते. डॉ. पवार यांनी रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून तपासण्या उपलब्ध करून दिल्या. डॉ. पी. एस. करमरकर व डॉ. पी. व्ही. रनबागले यांचे मार्गदर्शन घेतले. डॉ. सदानंद राऊत यांनी रुग्ण तपासून हिरवा कंदिल दिला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजयकुमार भवारी, डॉ. वृषाली जाधव यांना मदतीला घेतलेशस्त्रक्रिया चालू होती रुग्णाच्या शरीरातील सर्व अवयव प्रचंड अशा गाठीमुळे इतरत्र विखुरलेले होते. बरेचसे अवयव गाठीला चिकटले होते. डॉ. देवमाने एक एक अवयव गाठीपासून अलग करीत होते. खूप वेळ लागत होता. शेवटी डॉ. देवमाने यांनी तिच्या शरीरातून ९.६० किलोचा गोळा बाजूला केला. भूलतज्ज्ञांनी अत्यंत शिताफीने हा क्षण सांभाळला. शस्त्रक्रियेच्या जखमा भरून आज ती मुलगी बोलायला, चालायला लागली. तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. मुलीची प्रकृती उत्तम आहे.

टॅग्स :Mancharमंचरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर