शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पीएमपीचे मोबाइल ॲप १५ लाख प्रवाशांनी केले डाउनलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:59 IST

‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’मुळे प्रवाशांना गाड्यांची वेळ, ठिकाण लाइव्ह दिसते. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार करता जवळपास ९० टक्के प्रवासी डिजिटल पद्धतीचा अवलंब करत आहेत

- अंबादास गवंडी  पुणे : शहरातील प्रवास सुलभ व्हावा यासाठी रिअल-टाइम बस ट्रॅकिंग, रूट मार्गदर्शन, ऑनलाइन तिकीट बुकिंग, पास व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना देण्यासाठी पीएमपीने ‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’ चार महिन्यांपूर्वी सुरू केले होते. सुरुवातीला ॲप डाउनलोड करण्याचे प्रमाण कमी होते. परंतु आता या मोबाइल ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १५ लाख पुणेकर प्रवाशांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. शिवाय वापरताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे.

‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’मुळे प्रवाशांना गाड्यांची वेळ, ठिकाण लाइव्ह दिसते. त्यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार करता जवळपास ९० टक्के प्रवासी डिजिटल पद्धतीचा अवलंब करत आहेत. या ॲपद्वारे बसचा मार्ग, वेळापत्रक, थांबे याची त्वरित माहिती मिळते, तिकीट खरेदी करणेही सोपे झाले आहे. सुरुवातीला ॲपला कमी प्रतिसाद होता. आता वापरकर्ते वाढले आहेत. त्यामुळे ही संख्या १५ लाखांपेक्षा जास्त पोहोचली आहे. शिवाय आयफोनधारक प्रवासी ॲप डाउनलोड करत आहे. त्यामुळे मोबाइल ॲपचे वापरकर्ते वाढत आहे.

सर्व सेवा एकाच ॲपमध्ये

प्रवासी थांबलेल्या ठिकाणावरून इच्छित स्थळाची बसमार्गाची माहिती मिळते. मोबाइल ॲपमधून प्रवाशांना आपल्या बसचे लाइव्ह लोकेशन दिसत असल्यामुळे बस थांब्यावर बस किती वेळात येणार हे समजते. तसेच ॲपवरून यूपीआयचा वापर करून तिकीट बुक करता येते. प्रवाशांना दैनंदिन पास काढण्याची सुविधादेखील ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना सर्व प्रकारचे पास करण्याची सुविधा आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होत आहे.

अशी आहे आकडेवारी :

ॲड्राॅइड डाउनलोड - ५६,२००

आयओएस व्हर्जन - १४,८४,८४४

एकूण डाउनलोड - १५,४१,०४४

प्रवाशांना डिजिटल सुविधा मिळाल्यामुळे वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पीएमपी कटिबद्ध आहे.- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpassengerप्रवासी