जुगार खेळताना १५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:11 IST2021-03-16T04:11:04+5:302021-03-16T04:11:04+5:30

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लांभाते व सहाय्यक पोलीस निरीक्षक ...

15 arrested for gambling | जुगार खेळताना १५ जणांना अटक

जुगार खेळताना १५ जणांना अटक

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लांभाते व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी ही कारवाई केली. पिंगळवाडी येथील इंण्डेन गॅस एजन्सीचे पाठीमागील एका बंगल्यामध्ये जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मौजुदीन कबरदीन मुजावर, विक्रम बबन काळे, जयसिंग सखाराम फलके (सर्व रा. घोडेगाव) समिर भानुदास वाळुंज, दिलीप सोनु केंगले, चेतन तानाजी बाणखेले (सर्व रा. मंचर) प्रदीप श्रीधर सावंत, दत्तात्रय उल्लास लोहोट (रा. गंगापूर खुर्द) मंगेश खंडू शेवाळे (रा. लांडेवाडी) सोमनाथ रोहिदास काळे (रा. धोंडमाळ) एकनाथ मारुती गोसावी (रा.पिंगळवाडी) परशुराम नामदेव धनवटे (रा. राजगुरुनगर) अमोल विलास चासकर (रा. चास) रामदास बाळकृष्ण हत्ते (रा. शिनोली) गोकूळ शांताराम लोहोट (गंगापूर बु.) या १५ जणांना ताब्यात घेतले.

यावेळी २९ हजार ३९० रुपये रोख तसेच पाच दुचाकी असा २ लाख ७९ हजार ४१० रूपयांचे साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

Web Title: 15 arrested for gambling