शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील १४ प्रकल्पांचा झाला प्रारंभ

By admin | Updated: June 26, 2016 04:50 IST

शहरामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने बटन दाबून शुभारंभ करण्यात आला.

पुणे : शहरामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने बटन दाबून शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शाश्वत रोजगार निर्मिती, झोपडपडपटट्ी पुर्नवसन, पीएमपी अ‍ॅप, मी कार्ड अशा प्रकल्पांचा समावेश आहे.औंध-बाणेर-बालेवाडी मॉडेल एरियातील प्रोजेक्ट : शाश्वत रोजगार निर्मिती केंद्र : तरूणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी वॉर्डस्तरावर लाइट हाऊस उभारले जाणार आहेत. प्रायोगित तत्त्वावर औंध क्षेत्रिय कार्यालयात लाइट हाऊस उभारण्यात आले असून त्यानंतर इतर वॉर्डांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. बाबासाहेब आंबडेकर वसाहतीचे पुर्नवसन : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील कुटुंबियांचे ‘सर्वांसाठी घर’ या योजनेअंतर्गत पुर्नवसन केले जाणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी सभागृह, अंगणवाडी यासह विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.पादचारी मार्गाचा विकास : नागरिकांच्या सर्वकष सहज संचारासाठी पादचारी मार्ग व सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट औंध-बाणेरमध्ये राबविला जाणार आहे.पीएमपी संबंधित प्रकल्पनियंत्रण कक्ष : सुरक्षित व सुनिश्चित सार्वजनिक वाहतुकीसाठी एक सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पीएमपीचे व्यवस्थापन या कक्षामार्फत पाहिले जाणार आहे.वाहनांची सुयोग्य देखभाल : पीएमपीसह सार्वजनिक वाहनांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहने रस्त्यांमध्येच बंद पडून होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासापासून यामुळे सुटका होऊ शकणार आहे.मोबाइल अ‍ॅप : पीएमपी बसचे वेळापत्रक, बस स्टॉपवर कधी येणार, बसची सध्याची स्थिती आदीची माहिती नागरिकांना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मी कार्ड : पीएमपी बसच्या प्रवाशांना मोबिलीटी कार्डच्या माध्यमातून तिकिट, पासचे पैसे देता येणार आहेत.सौरऊर्जा प्रकल्प : सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी महापालिकेकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. नागरिकांनी सौरऊर्जेतून वीजेची गरज भागवावी व उर्वरित वीज शासनाला विकावी असे नियोजन आहे.प्लास्टिक वॉटल रिसायकलींग प्रकल्प : शहरातील प्लास्टिक कचऱ्यांची समस्या सोडण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये प्लास्टिक वॉटल रिसायकींग प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याची शास्त्रीय पध्दतीने पुर्नवापर करण्यात येणार आहे.मुव्ह ट्रॅकिंग सिस्टिम : शहरतील सर्व कचरा गाडयांना जीपीएस बसविण्यात आले आहे. शहराची स्वच्छता चांगल्याप्रकारे राखण्यासाठी या मुव्ह ट्रॅकिंग सिस्टिमची मदत होणार आहे.ट्रफिक डिमांड कंट्रोल : शहरातील वाहतुकीनुसार सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या ट्रफिक डिमांड कंट्रोलची व्यवस्था कार्यान्वित करण्यात येत आहे.क्वाटिंफाइड सिटीज मुव्हमेंटशहराच्या विकासामध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा याकरिता क्वाटिफाइड सिटीज मुव्हमेंट हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.१०० टक्के तक्रार निवारण प्रणालीपीएमसी केअर अंतर्गत पाणी पुरवठयासंबंधी तक्रार निवारणाकरिता कक्ष उभारण्यात आला आहे. पाणी पुरवठयाच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात येणार आहेत.