शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग व्यावसायिकांकडे १३४ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 07:41 IST

शहरातील होर्डिंग व्यावसायिकांकडे मुख्य लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार तब्बल १४२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी गेल्या वर्षभरात केवळ ७ कोटी ७५ लाख रुपयांची थकबाकी

सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : शहरातील होर्डिंग व्यावसायिकांकडे मुख्य लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार तब्बल १४२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी गेल्या वर्षभरात केवळ ७ कोटी ७५ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली असून, अद्यापही तब्बल १३४ कोटी ३१ लाख ६६ हजार रुपयांची प्रचंड मोठी थकबाकी विविध होर्डिंगधारकांकडे असल्याची धक्कादायक माहिती परवाना व आकशचिन्ह विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचा आकडा कमी होत असतानाही महापालिकेकडून हक्काचे व सहज मिळणे शक्य असणाºया कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शहरात सध्या १ हजार ७४९ जाहिरात फलक असून, त्या सर्वांच्या परवान्यांचे महापालिकेकडून नूतनीकरण करण्यात आले आहे. तर, ९९ होर्डिंग अनधिकृतपणे सुरू आहेत. ही अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सध्या आकाशचिन्ह विभागामार्फत सुरू आहे. महापालिकेच्या होर्डिंग नियमावलीला हरताळ फासणाºया होर्डिंग व्यावसायिकाकडे तब्बल १३४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे लेखापरीक्षकांच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. यामध्ये अनेक होर्डिंगधारकांनी कागदोपत्री आपण होर्डिंग बंद करीत असल्याचे लेखी कळविले आहे. यामुळे महापालिकेच्या आकाचिन्ह विभागानुसार केवळ ७१ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.महापालिकेच्या वतीने होर्डिंग वाटपात होणारा राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने ई-लिलाव पद्धत सुरू केली. ई-लिलावामुळे थेट राजकीय हस्तक्षेप कमी झाला असला, तरी अनेक थकबाकीदारांना असलेला राजकीय वरदहस्त व अधिकाºयांच्या लागेबांध्यांमुळे वर्षानुवर्षे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. लाखो रुपयांची थकबाकी असतना नवीन जाहिरात फलकाला परवानगी देताना जुनी थकबाकी वसूल करण्याची केवळदक्षता घेण्यात येते. परंतु, हीच थकबाकी भरल्याशिवाय नवीन परवाना दिला जाणार नाही, अशी कडक भूमिका घेतल्यास महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल होण्यास मदत होईल. परंतु, १३४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महापालिका सर्वसामान्य करदात्यांवर मालमत्ता व पाणीपट्टी करवाढीचा बोजा टाकत आहे.

टॅग्स :Puneपुणे