शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी दीड वाजता मुंबईत असते दाट धुके!; रेल्वेचा जावईशोध, कर्जत पॅसेंजर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:12 IST

थंडीचे दिवस असल्याने सध्या सकाळच्या वेळी दाट धुके पडत असल्याने काही रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे़ पण, कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्द केली आहे़

ठळक मुद्देकर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्दअनेकांना सहन करावा लागला़ मनस्ताप

पुणे : थंडीचे दिवस असल्याने सध्या सकाळच्या वेळी दाट धुके पडत असल्याने काही रेल्वेगाड्यांना उशीर होत आहे़ पण, कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने रद्द केली आहे़ त्यामुळे मुंबईत दुपारी दीड वाजताही दाट धुके असते का अशा प्रश्न प्रवाशांना पडला आहे़ पुणे-कर्जत -पुणे (५१३१७/५१३१८) ही गाडी पुण्याहून सकाळी १११५ वाजता निघते व कर्जतला दुपारी दीड वाजता पोहचते़ तेथून  ती ३ वाजता निघून पुण्यात सायंकाळी साडेपाच वाजता पोहचते़ या पॅसेंजरच्या तिकीटाचा दर कमी असल्याने असंख्य गरीब नागरिक या गाडीने जाणे पसंत करतात़ पुणे-मुंबई दरम्यान घाट क्षेत्रात सकाळी दाट धुके असते़ त्यामुळे सकाळच्या वेळी गाड्यांना उशीर होऊ शकतो़ हे एकवेळ मान्य केली तरी ११ वाजता निघणारी पॅसेंजर धुक्यामुळे कशी काय रद्द होऊ शकते़ याशिवाय ही गाडी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे़ १३ व १४ डिसेंबरलाही दाट धुके पडणार आहे, असे रेल्वे प्रशासनाला अगोदरच कसे काय माहिती पडले, असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे़ प्रवासी कमी असल्याचे कारण देऊन पुणे-लोणावळा दरम्यानची रात्रीची लोकल या अगोदरच रेल्वेने रद्द केली आहे़ आता धुक्याचे कारण देऊन पॅसेंजर रद्द केली आहे, त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे़पुणे-कर्जत-पुणे ही पॅसेंजर १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात येत असल्याची माहिती ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा रेल्वेकडून जाहीर करण्यात आले़ त्यामुळे त्याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहचू शकली नाही़ त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला़ 

याबाबत पंकज ओसवाल यांनी सांगितले की, आपण कर्जत रेल्वे स्थानकावर फोन करुन विचारल्यावर त्यांनी याबाबत काहीही माहिती नाही़ कंट्रोलरला विचारुन सांगतो, असे सांगण्यात आले़ गाडी रद्द करण्याविषयी पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांना टष्ट्वीव करुन विचारणा केली़ तेव्हा त्यांनी धुक्यामुळे गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगितले़ हे कारण न पटण्यासारखे आहे़ कारण ही गाडी ११.१५ वाजता सुटते़ तेव्हा धुके असण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे ओसवाल यांनी सांगितले़ 

टॅग्स :Karjatकर्जतRailway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे