शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी १३० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 18:50 IST

या पुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत निधी देण्यास मंजुरी या प्रकल्पासाठी राज्यसरकारचे विशेष प्रकल्प म्हणून मान्यता देत १८५ कोटींचे अनुदान या पुलासाठीची सुमारे ९६ टक्के जागा महापालिकेने केली संपादित

पुणे : शहरातील बहुचर्चित चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी दुस-या टप्प्यात तब्बल १३० कोटी रुपये ६९ लाख रुपयांचा मोबदला देण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात महापालिकेने ८६ कोटी रुपयांचे भूसंपादन केले आहे. चांदणी चौकातील प्रस्तावित उडडाणपुलासाठी  महापालिकेकडून सुमारे २८ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. त्यात सुमारे १३ हेक्टर खासगी जागा आहे. यात काही जागा  बीडीपी तसेच विकास आराखड्यात आरक्षित आहे. पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून या भागात असलेल्या बांधीव इमारतींच्या मिळकतधारकांना सुमारे ८६ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. त्यानंतर आता दुस-या टप्प्यात १०.६० हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले आहे.  त्यात सुमारे ७९ जागामालकांचा समावेश आहे. यातील सुमारे ५.५७ हेक्टरच्या जागा मालकांना रोख स्वरूपात १३० कोटींचा निधी दिला जाणार आहे. तर उर्वरीत ५.४ हेक्टरच्या जागा मालकांना टीडीआर आणि  एफएसआय च्या माध्यमातून मोबदला दिला जाणार आहे,अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळिक यांनी दिली.  या पुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केले आहे. असे असतानाही तब्बल दीड वर्षांचा कालावधी गेला, तरी हे काम अजून सुरू झालेले नाही.  या प्रकल्पासाठी राज्यसरकारने विशेष प्रकल्प म्हणून मान्यता देत १८५ कोटींचे अनुदान दिलेले असले तरी, प्रत्यक्षात या पूलाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. या पुलासाठीची सुमारे ९६ टक्के जागा महापालिकेने संपादित केली आहे. मात्र, अजून त्यातील काही जागेची कागदपत्रे पालिकेकडे आलेली नाहीत. तसेच उर्वरित ४ टक्के जागा ताब्यात आल्याशिवाय, काम सुरू न करण्याची भूमिका हे काम करण्यात येणा-या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. त्यामुळे अवघ्या ४ टक्के जागेसाठी हे काम रखडले आहे.  

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडState Governmentराज्य सरकारNitin Gadkariनितीन गडकरीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका