शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दौंड-पुणे पॅसेंजरमधील १३ महिला प्रवाशांना अटक व दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:05 IST

या महिलांना आंदोलन करणे आणि अनधिकृतपणे चेन ओढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आले.

ठळक मुद्देन्यायालयाने १२ महिलांना ४०० रुपये तर एका महिलेवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई घोरपडी यार्डात कोणत्याही गाडीला थांबा देणे सध्यातरी शक्य नाही

पुणे : दौंड-पुणे पॅसेंजरला घोरपडी येथे थांबा द्यावा या मागणीसाठी चेन ओढून गाडी थांबविल्याप्रकरणी सोमवारी (दि. ९) १३ महिला प्रवाशांना अटक करण्यात आले. रेल्वे न्यायालयाने यातील १२ महिलांना ४०० व एका महिलेला ५०० रुपये दंड ठोठावला. दौंड स्थानकातून सकाळी ७.०५ वाजता सुटणाऱ्या पॅसेंजरने या महिला प्रवास करत होत्या. ही गाडी घोरपडी यार्डात आल्यानंतर काही महिलांनी अचानक चेन ओढून गाडी थांबविली. तसेच त्यानंतर या १३ महिलांनी गाडीच्या इंजिनसमोर उभे राहून आंदोलन केले. या प्रकारामुळे गाडी पुढे जाण्यास खुप विलंब झाला. तसेच पॅसेंजरमागील अन्य सहा गाड्यांनाही विनाकारण उशीर होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना रेल्वे अधिनियमातील विविध कलमांअंतर्गत आंदोलन करणे आणि अनधिकृतपणे चेन ओढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आले. या महिलांना नंतर रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ महिलांना ४०० रुपये तर एका महिलेवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.गाड्या वेळेत चालविण्यासाठी रेल्वेकडून खुप प्रयत्न केले जातात. पण आंदोलनामुळे गाड्यांच्या वेळेवर परिणाम झाला. हा मार्ग दोन्ही बाजूने व्यस्त असल्याने अपघात होण्याचा धोका असतो. याठिकाणी २०१७-१८ या वर्षात रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या २६ नागिरकांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. त्यामुळे प्रवाशांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करता रेल्वेला वेळेत गाड्या चालविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे...................घोरपडी यार्डात कोणत्याही गाडीला थांबा देणे सध्यातरी शक्य नाही. थांबा द्यायचा असल्यास तशा सुविधा निर्माण कराव्या लागतील. त्यामुळे चेन ओढणे, आंदोलन करणे हे चुकीचे आहे. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून इथे उतरतात. त्यामुळे रेल्वेकडून झालेली कारवाई योग्यच आहे.- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेWomenमहिलाpassengerप्रवासीArrestअटक