शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बनावट सह्या घेऊन केले १३ लाखांचे कर्ज मंजूर; बँक आॅफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 14:31 IST

जामीनदाराची खात्री न करता बनावट सह्या घेऊन १३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याबद्दल विश्रामबाग पोलिसांनी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांसह एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे़ 

ठळक मुद्दे विश्रामबाग पोलिसांनी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांसह एका व्यावसायिकावर केला गुन्हा दाखल एका कर्ज प्रकरणात जामीन असताना तीन वेगवेगळ्या प्रकरणात जामीनदार म्हणून बनावट सह्या

पुणे : जामीनदाराची खात्री न करता बनावट सह्या घेऊन १३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याबद्दल विश्रामबाग पोलिसांनी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांसह एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे़ बँक आॅफ महाराष्ट्रच्या बाजीराव रोड शाखेचे तत्कालीन सहाय्यक महाव्यवस्थापक जे़ व्ही़ मुजुमदार, एस़ बी़ ब्रम्हे, सहाय्यक व्यवस्थापक बी़ जी़ जोशी, एस़ बी़ देशपांडे आणि व्यावसायिक रवी कुलकर्णी (रा़ संतनगर, पर्वती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी भरत बाबुराव भुजबळ (वय ५१, रा़ नाविन्य सोसायटी, वारजे) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ यांची युनिटेक ही कंपनी असून रवी कुलकर्णी यांची फ्युजन कंट्रोल ही फर्म असून त्यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे़ दोघेही मित्र असून रवी कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बँकेच्या बाजीराव रोड शाखेतून साडेतीन लाख रुपयांचे सीसी लोन घेतले होते़ या कर्जाला भरत भुजबळ हे जामीनदार होते़ त्यानंतर ३० आॅक्टोंबर २०१० रोजी बँकेकडून भुजबळ यांना रवी कुलकर्णी यांचे १३ लाख रुपयांचे कर्ज थकले असून तुम्ही जामीनदार असल्याचे त्यात म्हटले होते़ यानंतर रवी कुलकर्णी यांनी त्यांना मी बँकेचे कर्ज फेडतो, तु काळजी करु नकोस असे आश्वासन दिले़ भुजबळ यांनी बँकेतून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीही माहिती मिळू शकली नाही़ त्यानंतर ६ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांना डेब्ट ट्रिब्युनल लवादाची नोटीस आली़ त्यात रवी कुलकर्णी यांच्या कर्जास जामीनदार म्हणून तुमची तळेगाव ढमढेरे येथील वडिलोपार्जित व तुमच्या नावे असलेल्या इतर मालमत्तेचा कोणताही व्यवहार करु नये, असे म्हटले आहे़ भुजबळ यांनी लवादातून कागदपत्रे मागविली असता ते एका कर्ज प्रकरणात जामीन असताना तीन वेगवेगळ्या कर्ज प्रकरणात जामीनदार म्हणून त्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या होत्या़ रवी कुलकर्णी याने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन विश्वासघात केला व बँकेच्या अधिकाऱ्यांनी जामीनदाराची खात्री न करता परस्पर कर्ज मंजूर केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे अधिक तपास करीत आहेत़ 

टॅग्स :bankबँकPuneपुणे