शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

पुण्यात जानेवारीत खुनाच्या १२ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 03:24 IST

अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग; ३ वर्षांत १,२०० मुले रेकॉर्डवर

पुणे : किरकोळ कारणावरून, वैयक्तिक वैमनस्यातून या जानेवारीच्या पहिल्या २८ दिवसांत शहरात खुनाच्या तब्बल १२ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांशी तुलना करता त्यात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते़ या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढत असलेला सहभाग चिंताजनक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.सिंहगड रोड येथे येथे गेल्या रविवारी रोहन साळवी या तरुणाचा चौघांनी कोयत्याने वार करून खून केला़ ही चौघेही अल्पवयीन मुले आहेत़गेल्या आठवड्यात वडगाव बुद्रुक येथे चाजनिज गाडी लावणाऱ्या एकाचा तीन अल्पवयीन मुलांनी खून केला होता़ याशिवाय वाहनचोरी, घरफोडी, तसेच दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणाºयांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढत सहभाग दिसून येत आहे़ डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारती विद्यापीठात दोन टोळ्यांमधील वैमनस्यातून खुनाची घटना घडली होती़ २०१७मध्ये जानेवारी महिन्यात खुनाच्या ८ घटना घडल्या होत्या, तर २०१७मध्ये २ आणि २०१६ मध्ये खुनाच्या ६ घटना घडल्या होत्या.याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले, की अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील वाढता सहभाग हा चिंताजनक आहे़ जानेवारी महिन्यात आतापर्यंत झालेल्या खुनाच्या १२ घटनांपैकी केवळ दत्तवाडी येथील खुनामधील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे़ इतर घटना या वैयक्तिक व कौटुंबिक कारणातून घडल्या आहेत़ गेल्या तीन वर्षांत एकूण १ हजार २०० अल्पवयीन मुले गुन्हे करताना सापडले आहेत़ पोलिसांच्या रेकॉर्डवरील या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात या मुलांच्या पालकांसमवेत बैठका घेण्यात येत आहे़ आतापर्यंत १५ पोलीस ठाण्यांत या बैठकांत त्यांचे समुपदेशन झाले़ अन्य ठाण्यांतही अशा बैठका घेण्यात येणार आहेत.अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी प्रयत्नविधिसंघर्षग्रस्त मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी शहर पोलीस दलाने सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही मुले व त्यांचे पालक यांच्या बैठका आयोजित करण्यास सुरुवात केली आहे़ दुसºया टप्प्यात भरोसा सेलमार्फत त्यांचा मेळावा आयोजित करून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे़ तसेच, समाजातील आयकॉन असलेल्या व्यक्तीशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल.- शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त

टॅग्स :MurderखूनPuneपुणे