शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठामध्ये पीएचडीसाठी ११०० जागा, लिंक उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 12:28 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच विविध विषयांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र विद्यापीठाकडे पीएचडी गाइडची नोंदणी कमी झाल्याने प्रवेशासाठी खूप कमी जागा उपलब्ध झाल्या होत्या.

ठळक मुद्देमुलाखत दिलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नव्याने ३९७ पीएचडी गाइड उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडील पीएचडी मार्गदर्शनासाठीच्या ११०० जागा नव्याने उपलब्ध झाल्या आहेत. विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या पीएचडी प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४ हजार विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच विविध विषयांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र विद्यापीठाकडे पीएचडी गाइडची नोंदणी कमी झाल्याने प्रवेशासाठी खूप कमी जागा उपलब्ध झाल्या होत्या. दरम्यान, पीएचडी प्रवेशासाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व विभागांनी त्यांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. जागा कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश मिळू शकलेला नव्हता, या विद्यार्थ्यांना आता पीएचडी प्रवेशासाठी पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे. सर्व विषयांनिहाय साधारणत: ४ हजार विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. मुलाखतीला पात्र ठरल्यानंतर काही कारणांमुळे मुलाखत देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा मुलाखत देता येणार आहे. पीएचडी प्रवेशप्रक्रियेत जे विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचले होते त्यांना या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुलाखत देता येणार आहे. सेट/नेट उत्तीर्ण असलेल्या, तसेच विद्यापीठाकडून घेण्यात आलेली पीएचडीपूर्व परीक्षा (पेट) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. तांत्रिक अडचणींमुळे अनेक प्राध्यापकांना पीएचडी गाइड म्हणून नोंदणी करता आली नव्हती. त्या अडचणी दूर करून त्यांची पीएचडी गाइड म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पीएचडी गाइड म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या प्राध्यापकांना नव्याने पीएचडी गाइड म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ३९७ पीएचडी गाइडकडील ११०० जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.लिंक उपलब्ध करणारपीएचडी प्रवेशप्रक्रियेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४ हजार विद्यार्थ्यांना नव्याने पीएचडी प्रवेशासाठी उपलब्ध झालेल्या ११०० जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या गाइडकडील जागांनुसार पीएचडी केंद्र निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक्स उपलब्ध करून दिली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ