शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर येथे बीएसएनएल कंपनीच्या कार्यालय परिसरातून ११ लाखांच्या केबलची चोरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:24 IST

अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल

लोणी काळभोर : येथील बीएसएनएल कंपनीच्या कार्यालयाचे आवारातील भांडारगृहातुन ११ लाख ५३ हजार ९३० रुपये किमतीची १ हजार ५०० मिटर कॉपर केबल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असल्याची घटना उघडकीस आली आहे.   याप्रकरणी भारत सरकारचे बी. एस. एन. एल मोबाईल कंपनीचे लोणी काळभोर येथील भांडारगृहातील कनिष्ठ दुरसंचार अधिकारी अभिजीत अरविंद खडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर येथील बी. एस. एन. एल च्या भांडारगृहातून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात कॉपर केबल व इतर साहीत्य यांचा पुरवठा केला जातो. येथील कार्यालय आवार परीसरात झाडे, वेली वाढलेली असल्याने २० नोव्हेंबर रोजी केरकचरा साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी  हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.            येथील कार्यालय आवारांत ४६ ड्रम उघड्यावर ठेवलेले होते. त्यातील प्रत्येक ड्रम मध्ये अंदाजे ३६५ मिटर केबल आहे. त्याची मोजणी करीत असताना त्यातील काही ड्रम मध्ये केबल नसल्याचे दिसून आलेने सर्व ड्रम एकत्र करून पाहणी केली असता त्यातील ४ ड्रमची पुर्ण व २ ड्रमची अंदाजे २० मिटर केबल अशी एकुण १ हजार ५०० मीटर केबल चोरीस गेली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खडके यांनी सदर बाब वरिष्ठांना कळवली. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहेे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरtheftचोरीPoliceपोलिस