शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जखमींच्या मदतीसाठी निघालेली ‘१०८ रुग्णवाहिका’ उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:37 IST

गॅस सिलिंडर ट्रकच्या अपघातातील जखमींवर उपचारासाठी निघालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाच अपघाताला सामारे जावे लागल्याची घटना घडली.

ठळक मुद्देडॉक्टरसह चालक जखमी : दुचाकीस्वाराला वाचविताना ब्रेक दाबल्याने अपघात

बारामती : गॅस सिलिंडर ट्रकच्या अपघातातील जखमींवर उपचारासाठी निघालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाच अपघाताला सामारे जावे लागल्याची घटना गुरुवारी (दि. ३) दुपारी चारच्या सुमारास घडली. आपत्कालीन प्रसंगात धावुन जाणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालकावरच हा प्रसंग ओढवला.या अपघातामध्ये सुदैवाने हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.गुरुवारी दुपारी उंडवडी कडे पठार येथील वळणावर मद्यपी चालकाचे नियंत्रण न राहिल्याने गॅस सिंलींडर भरुन निघालेला ट्रक (एमएच १२ एफझेड ६७६७) उलटला. हा ट्रक भरधाव वेगाने निघाला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. मद्यपी चालकाचे नियंत्रण न राहिल्याने येथील वळणावर ट्रक रस्त्याच्या पुढे जावून चारीत उलटला. या अपघातामध्ये ट्रक चालक अर्जुन लव्हाळे हा किरकोळ जखमी झाला. या अपघातातील जखमीवर उपचार करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल केला. त्यामुळे जखमींवर उपचारासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तातडीने निघाली. मात्र, शहराच्या बाहेर देशमुख चौकातून जात असताना अचानक दुचाकीस्वार समोर आला. दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने तातडीचा ब्रेक दाबला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी जागेवर फिरुन उलटली. अपघाताला कारणीभुत ठरलेला दुचाकीस्वार बचावला. मात्र, हा दुचाकीस्वार घटनास्थळावर न थांबता पसार झाला. अपघातामध्ये रुग्णवाहिकेतील डॉ.अशोक डोंबाळे, चालक हेमंत डोंबाळे जखमी झाले. घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात अपघाताबाबत कळविण्यात आले आहे, अशी माहिती येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिरा चिंचोलीकर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात