शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या लोकसभेपासून मतदान करणाऱ्या १०५ वर्षांच्या डॉ घाटपांडे यांनी केले मतदानाचे आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 13:53 IST

मी 1952 म्हणजे पहिल्या लोकसभेपासून मतदान करतो. मतदान हा आपला अधिकार आहे, नव्हे कर्तव्य आहे.

- नेहा सराफपुणे : १०५ वर्षांच्या डॉ बळवंत पंढरीनाथ घाटपांडे यांनी  आज पुण्यात सकाळी १० वाजता मतदानाचा हक्क बजावला.विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ पासून घेण्यात पहिल्या लोकसभेच्या मतदानापासून ते आज होणाऱ्या १७ व्या लोकसभेपर्यंत दरवेळी मतदान करतात. यावेळी त्यांनी आपल्या आठवणी लोकमतच्या वाचकांशी शेअर केल्या.मंगळवारी( दि. २३) त्यांनी पुण्यातील आर सी एम गुजराथी हायस्कुलमधून मतदान केले.त्यानंतर घाटपांडे म्हणाले की, मी 1952 म्हणजे पहिल्या लोकसभेपासून मतदान करतो. मतदान हा आपला अधिकार आहे, नव्हे कर्तव्य आहे. त्यामुळे ते प्रत्येकाने बजावायलाच हवे.आज आपल्या देशाला नि:स्वार्थी, लोकांसाठी काम करणारा आणि योग्यपणे देश चालवणाऱ्या नेत्याची गरज आहे, त्यामुळे मतदान करायलाच हवे.माझ्या आठवणीत अनेक निवडणुका आहेत. पुण्यात गुप्ते नावाचे वकील उभे असताना त्यांच्यासमोर एक महिला उमेदवार उभ्या होत्या.त्यांनीही उत्तम लढत देत गुप्ते यांना धावपळ करायला लावल्याचे मला आठवते. त्यावेळी या लढतीची चर्चा पुण्यात खूप रंगली होती. हल्ली निवडणूकीचा बदलता पॅटर्न म्हणजे लोकांना त्यातून पैसे हवे आहेत. पूर्वी पैशांची अपेक्षा नसायची पण आता प्रत्येक मेंबर हा पैशांची अपेक्षा करताना दिसतो.अलीकडच्या काळात समाविष्ट झालेला नोटा हा पर्याय नव्याने समाविष्ट झाला आहे. मला हा पर्याय असणे योग्य वाटते कारण उमेदवार नको असला तरी मतदान करण्याचा अधिकार यात बजावता येतो. प्रत्येकाने देशाचा विचार करून मतदान करायलाच हवे.त्याला किंमत न देणे चुकीचे आहे. देश कार्याला मतदान करून सुरुवात करावी.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणेVotingमतदान