शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निधी शंभर कोटींचा, कामे मात्र शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:39 IST

जी गावे समाविष्ट करून घेतली त्यांच्याच विकासकामांना मुहुर्त मिळत नसल्याने तिथे आता ओरड होऊ लागली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीने अंदाजपत्रकात या गावांसाठी १०० कोटी रूपयांचा महसूल जमाक्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांचे कामनिहाय व खर्चनिहाय नियोजन तयार करण्याचे आदेश

पुणे :  न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांची व्यथा काही संपुष्टात यायला तयार नाही. अंदाजपत्रकात १०० कोटी रुपये खास निधी म्हणून ठेवूनही अजून या गावांमधील विकासकामांना मुहुर्त लागायला तयार नाही. या गावांची तात्पुरती जबाबदारी दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांचा कामनिहाय खर्चाचा तपशील द्यावा म्हणजे त्याप्रमाणे तरतुद करून देण्यात येईल असे प्रशासनाने त्यांना कळवले आहे. लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, पुष्ठरसुंगी, उरुळी देवाची ही ११ गावे न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झाली आहे. आणखी २३ गावे शिल्लक असून ती येत्या काही वर्षात समाविष्ट करण्यात येतील असे राज्य सरकारने न्यायालयाला लिहून दिले आहे. मात्र जी गावे समाविष्ट करून घेतली त्यांच्याच विकासकामांना मुहुर्त मिळत नसल्याने तिथे आता ओरड होऊ लागली आहे. रस्ते, पाणी,सार्वजनिक आरोग्य, या मुलभूत समस्यांचेही तिथे काही नियोजन नसून उद्यान, व्यायामशाळा, सभागृह या सुविधांचे तर नावही निघायला तयार नाही.ग्रामपंचायती विसर्जित केल्या असल्यामुळे सध्या या गावांमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. नजिकच्या क्षेत्रीय कार्यालयांना ही गावे जोडून दिली आहेत. त्यांनी तिथे प्राथमिक कामे पहावीत असे आदेश देण्यात आले आहेत. सफाईकामगार व अन्य काही गोष्टींचे नियोजन झाले आहे, मात्र रस्त्यांची कामे, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन असे काहीही अजून होत नाही. त्यामुळे गावातील कार्यकते, माजी पदाधिकारी महापालिका प्रशासनाकडे किंवा स्थानिक नगरसेवकांकडे चकरा मारून त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने मध्यंतरी त्यांची एक बैठक घेतली मात्र त्यात कामांच्या निविदा कधी काढणार अशीच फक्त विचारणा झाली व तक्रारी केल्या गेल्या. स्थायी समितीने अंदाजपत्रकात या गावांसाठी १०० कोटी रूपयांचा महसूल जमा केला आहे. तसेच महापालिकेच्या मिळकत कर विभागानेही या गावांमधून ग्रामपंचायत दराने सुमारे २२ कोटी रुपये जमा केले आहेत. त्याशिवाय सर्व ग्रामपंचयातींचा निधी बँकांमध्ये असून तो एकत्रित केला तर ५० कोटी रुपये होतो. तेही पैसे महापालिकेकडे वर्ग होणार आहेत. या पैशांमधून रस्त्यांसारखी कामे करणे शक्य असतानाही क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याचे नियोजन होत नसल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे. अंदाजपत्रकात कोणत्या कामांसाठी किती निधी खर्च करायचा त्याचे वर्गीकरण दिले आहे, मात्र गावनिहाय तपशील येत नाही तोपर्यंत रकमेची तरतुद करणे प्रशासनाचा अडचणीचे झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आता क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांचे कामनिहाय व खर्चनिहाय नियोजन तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMONEYपैसा