शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

देशात १० कोटी टन पेट्रोल-डिझेलचा धूर; अमेरिका, चीन, जपान पाठोपाठ सर्वाधिक इंधन ज्वलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:13 IST

देशात गेल्या वर्षी (२०१६-१७) तब्बल दहा कोटी टन पेट्रोल आणि डिझेलचा धूर झाला असल्याची माहिती पेट्रोलियम प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसेस सेलने (पीपीएसी) दिली आहे.

ठळक मुद्देया वर्षी नोव्हेंबर अखेरीस तब्बल ७ कोटी टन देशभरात इंधनाचा वापरमाहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी मिळविली माहिती

विशाल शिर्के   पुणे : देशात गेल्या वर्षी (२०१६-१७) तब्बल दहा कोटी टन पेट्रोल आणि डिझेलचा धूर झाला असल्याची माहिती पेट्रोलियम प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसेस सेलने (पीपीएसी) दिली आहे. या इंधनाची रक्कम तब्बल ६६८ दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे. या वर्षी देखील नोव्हेंबर अखेरीस तब्बल ७ कोटी टन इंधनाचा वापर देशभरात झाला आहे.   अमेरिका, चीन, जपान पाठोपाठ भारतात सर्वाधिक इंधनाचे ज्वलन होते. त्यात मालवाहतूक, प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि उद्योगांना लागणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलचा समावेश आहे. देशात दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या २५ कोटींच्या वर आहे. देशात तब्बल ९० दिवसांचा इंधनाचा बफर स्टॉक केला जातो. त्या पद्धतीने इंधनाची आयात केली जाते. देशात २०१५-१६ साली २० कोटी २८ लाख ५० हजार टन क्रूड आॅईल, पेट्रोलची १० लाख १२ हजार आणि डिझेलची १ लाख ७७ हजार टन आयात झाली. तर २०१६-१७मध्ये २१ कोटी ३९ लाख ३२ हजार टन क्रूड आॅईल, ४ लाख ७६ हजार टन पेट्रोल आणि ९ लाख ९६ हजार टन डिझेल आयात करण्यात आले.   गेल्या वर्षी देशात पेट्रोल आणि डिझेल मिळून ९ कोटी ९७ लाख ८० हजार टन इंधनाचे ज्वलन झाले. त्यात ७ कोटी ६० लाख १५ हजार टन डिझेल, तर २ कोटी ३७ लाख ६५ हजार टन पेट्रोलचा समावेश होता. एका टनामध्ये तब्बल १० लाख लिटर इंधन सामावते. त्यावरुन इंधन वापराची कल्पना करता येऊ शकते. या वर्षी देखील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पेट्रोलचा १ कोटी ७३ लाख ७० हजार टन आणि डिझेलचा ५ कोटी ३३ लाख ८३ हजार टन वापर झाला आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल मिळून ७ कोटी ७ लाख ५३ हजार टन इंधनाचे ज्वलन अवघ्या आठ महिन्यांत झाले आहे. मे महिन्यात सर्वाधिक डिझेल आणि पेट्रोलचा वापर झाला आहे. या महिन्यांत पेट्रोलचा वापर २४ लाख ३ हजार टन, तर डिझेलचा वापर ७५ लाख २४ हजार टन इतका झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मिळविली आहे. पेट्रोलियम कोक खातेय भाव पेट्रोलियम पदार्थांत पेट्रोल आणि डिझेल वगळता देशात घरगुती वापराचा गॅस आणि औद्योगिक वापरासाठी पेट्रोलियम कोकचा सर्वाधिक वापर होता. त्यातही पेट्रोलियम कोकचा वापर तर पेट्रोलच्या वापरापेक्षा देखील अधिक आहे. पेट्रोलियम कोकचा वापर वीज आणि सीमेंट क्षेत्रात अधिक होतो. एक उत्तम इंधन म्हणून त्याकडे पाहीले जाते. एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत १ कोटी ७३ लाख ७० हजार टन पेट्रोलचा वापर देशात झाला. त्या तुलनेत पेट्रोलियम कोकचा वापर १ कोटी ७५ लाख ८९ हजार टन इतका झाला. एलपीजी गॅसचा वापर १ कोटी ५२ लाख २४ हजार टन इतका झाला आहे.  

२०१६-१७ मधील पेट्रोल-डिझेलचा वापर (रक्कम दशलक्ष डॉलरमध्ये)

पदार्थमेट्रीक टनरक्कम
पेट्रोल२३९२ कोटी ३७ लाख ६५ हजार
डिझेल४३८७ कोटी ६० लाख १५ हजार

 

पेट्रोलियम पदार्थ वापरणारी अव्वल राज्य (इंधन मेट्रीक टनामध्ये)  
राज्य२०१४-१५२०१५-१६२०१६-१७
महाराष्ट्र१,६९,२२,०००१,८२,२७,०००१,९३,३३,०००
गुजरात१,७६,२५,०००१,८९,७९,०००१,८९,६३,०००
उत्तरप्रदेश१,३३,४७,०००१,५०,११,०००१,५९,२९,०००
तमिळनाडू१,२२,१०,०००१,२६,९८,०००१,३२,८४,०००
कर्नाटक९,५७,७०००१,१०,५१,०००१,१४,५९,०००
देशातील एकूण वापर१५,३१,६३,०००१६,५६,५३,०००१७,१२,२५,०००

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणे