शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील राजेंद्रनगरमध्ये १० कुत्र्यांचा मृत्यू; विष घालून मारल्याचा संशय, कावळेही मेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 13:59 IST

राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीमध्ये जवळपास १० कुत्री मेल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. त्यांना कोणीतरी विष घालून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकाही कावळेही मेलेले आढळून आल्याने नेमका काय प्रकार झाला याबाबत तर्कवितर्कांना उधाणयाप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आहोत : राहुल मानकर

पुणे : राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीमध्ये जवळपास १० कुत्री मेल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. त्यांना कोणीतरी विष घालून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषमध्ये काही कावळेही मेलेले आढळून आल्याने नेमका काय प्रकार झाला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे़त राजेंद्रनगरमध्ये पीएमसी कॉलनीतील इमारत क्रमांक १, २ व ३ च्या आसपास ही कुत्री मरुन पडली असल्याचे तेथील रहिवाश्यांना आज सकाळी आढळून आले़ तेथेच काही कावळेही मरुन पडले होते.

याबाबत राहुल मानकर यांनी सांगितले, की बुधवारी ३ कुत्री मरुन पडल्याचे आढळून आले होते़ लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ परंतु, आज १० पेक्षा अधिक कुत्री मरुन पडली असल्याने लोकांमध्ये त्याची एकच चर्चा होऊ लागली आहे़ या भागातील कचरा कुंड्या काढून टाकल्या आहेत़ तरीही काही ठिकाणी कडेलाच कचरा टाकला जातो़ या कचऱ्याजवळ काही कुत्री मरुन पडली असून तेथेच कावळेही मरुन पडले आहेत़ तर काही कुत्री तेथून काही अंतरावर जाऊन मरुन पडल्याचे दिसून आले आहे़ हा एकंदर प्रकार पाहता कोणीतरी विष घालून कुत्र्यांना मारल्याचे दिसून येत आहे़ याप्रकरणी आम्ही विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आहोत़ 

टॅग्स :Puneपुणे