शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याचा विचार करू; राऊतांनी सांगितली वेळ

By कुणाल गवाणकर | Updated: November 23, 2020 12:34 IST

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकारकडून 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याची तयारी सुरू

मुंबई: लव्ह जिहादविरोधात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. यानंतर आता राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारनं लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिहारमध्ये भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा केल्यावर त्याचा अभ्यास करू, असं राऊत म्हणाले.लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी'उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील सरकारं लव्ह जिहादविरोधात कायदा करणार आहेत. त्यानंतर आता भाजपचे राज्यातील नेतेही लव्ह जिहादविरोधी कायदा कधी करणार, असा प्रश्न ठाकरे सरकारला विचारत आहेत. याबद्दल मी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोललो. आधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये कायदा होऊ दे. त्यानंतर बिहारमध्ये कायदा होऊ दे. मग आम्ही त्याचा अभ्यास करू. यानंतर राज्य सरकार चर्चा करून निर्णय घेईल,' असं राऊत यांनी सांगितलं.'बिहारमध्ये भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार यांना आम्ही भाजपचे मुख्यमंत्री समजतो. कारण सर्वाधिक आमदार भाजपचे असल्यानं सरकारवर त्यांचंच नियंत्रण आहे. नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बिहार सरकारला लव्ह जिहादविरोधात कायदा करू दे. मग आम्ही त्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ,' अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रात लव्ह जिहादचा प्रश्न मोठा नाही. अर्थव्यवस्था, मंदी, बेरोजगारी, महामाई यासारख्या अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या समस्या देशासमोर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.वाढीव वीज बिलांविरोधात आज राज्यभरात भाजपची आंदोलनं सुरू आहेत. त्यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. वाढीव वीज बिल प्रश्नावरून दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेत्यांनी यासाठी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना भेटावं, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राऊत यांनी इंधन दरांकडेही लक्ष वेधलं. 'आम्ही वाढीव वीज बिलावरून जनतेला दिलासा देऊ. पण भाजपच्या नेत्यांनी इंधन दराकडे लक्ष द्यावं. त्यातूनही जनतेला दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही कमी व्हायला हवेत. सध्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर पाहता पेट्रोल, डिझेलचे दर ४५ ते ५० रुपये असायला हवेत. यासाठी राज्यातल्या भाजप नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत,' असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाLove Jihadलव्ह जिहादBJPभाजपा