शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मावळ मतदारसंघ : पिंपरीच्या वाढलेल्या मताचा कौल संमिश्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 4:38 PM

हे मतदान नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला याचा फटका बसणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पिंपरीत शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्ष यांनाही मतदारांचा कौल दिसून आला.

नारायण बडगुजर

पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघात यंदा पिंपरीचा  मतदानातील टक्का वाढला. पिंपरी विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत ५४.४६ टक्के मतदान झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही आकडेवारी ४८.७२ टक्के होती. यंदा ५.७४ टक्के जास्त मतदान झाले. या मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ३६८३७१ मतदार होते. या वेळी त्यात वाढ होणे अपेक्षित होते़ मात्र तसे न होता त्यात २०६१३ मतदारांची घट झाली. यंदा ३४७७५८ मतदार आहेत. नवमतदारांची मतदार यादीत नोंदणी करण्यात आली असली तरी दुबार, मयत आणि स्थलांतरितांची नावे वगळण्यात आल्याने मतदारांच्या संख्येत घट झाली. असे असले तरी यंदा मतदानाचा टक्का वाढला. हे मतदान नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला याचा फटका बसणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पिंपरीत शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्ष यांनाही मतदारांचा कौल दिसून आला.

सकाळच्या टप्प्यात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. पहिल्या दोन तासांत २३८८२ म्हणजे ६.८७ टक्के मतदारांनी मतदान केले. दुसºया टप्प्यात नऊ ते ११ दरम्यान ३७६०७ म्हणजे १०.८१ तर तिसºया टप्प्यात ११ ते एकच्या दरम्यान ४०९२८ म्हणजे ११.१७ टक्के मतदारांनी मतदान केले. मात्र दुपारी मतदानात घट झाली. एक ते तीनच्या दरम्यान २९१९६ म्हणजे ८.३९ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर पुन्हा मतदानाचा टक्का वाढला. तीन ते पाचच्या दरम्यान ३३८२४ म्हणजे ९.७२ टक्के मतदान केले. पाच वाजतानंतर २३९६७ मतदारांनी मतदान केले. ६.८९ टक्क्यांवर ती आकडेवारी गेली. शेवटच्या एका तासातील ही आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे. दोन तासांच्या सरासरीनुसार सर्वांत जास्त मतदान या एका तासात झाल्याचे दिसून येते. 

राखीव मतदारसंघ असल्याने उत्सुकता पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती - जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघात दलित मतांचा आकडा जास्त आहे. यासह मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारही मोठ्या संख्येने आहेत. झोपडपट्टीबहुल असलेल्या या मतदारसंघात प्राधिकरण, अजमेरा, वल्लभनगर, संत तुकारामनगर आदी विकसित भागही आहे. त्यामुळे संमिश्र असलेल्या या मतदारसंघातील मतदारांचा कौल नेमका कोणाला असेल, याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत. 

२०१४च्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारीएकूण मतदार : ३ लाख ६८ हजार ३७१झालेले मतदान : १ लाख ७९ हजार ४६१एकूण टक्केवारी : ४८.७२ टक्के

 

२०१९च्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारीएकूण मतदार : ३ लाख ४७ हजार ७५८झालेले मतदान : १ लाख ८९ हजार ४०४एकूण टक्केवारी : ५४.४६ टक्के

 गेल्या दोन निवडणुकांत पिंपरी मतदार संघातून शिवसेनेलाच मताधिक्य राहिले. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने केलेले काम तसेच विकासकामे केल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनाच मतदारांचा कौल मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मत विभागणी होईल. त्यामुळे सायंकाळी झालेल्या मतदानाचा फायदा राष्ट्रवादीला होणार नाही. महायुतीचाच विजय होईल. - गौतम चाबुकस्वार, आमदार, पिंपरी मतदारसंघ

अजित पवार यांच्यावर प्रेम असलेले व भाजपातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीसाठी काम करीत होते. तसेच सर्व गट-तट एकत्र आणण्यात आम्हाला यश आले. त्याचा फायदा महाआघाडीला होईल. तसेच शिवसेना, भाजपाने दलित व मुस्लिम मतदारांना दुखावले आहे. त्यामुळे ते मतदारांचाही महाआघाडीलाच कौल मिळेल. परिणामी वंचित बहुजन आघाडी किंवा बसपाचा फटका आम्हाला बसणार नाही. पिंपरीत राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. त्यामुळे पार्थ पवार निश्चितच विजयी होतील.   - संजोग वाघेरे,  शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :maval-pcमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक