शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पत्नी मंदाकिनी यांचा खुलासा; “विजय शिवतारे दुसऱ्या बाईसोबत राहतात, २७ वर्ष आम्ही वेगळं राहतोय, मग...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 16:42 IST

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला असून लेकीच्या आरोपाला आईनं उत्तर दिलं आहे.

ठळक मुद्देसर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. बदनामीच्या धमक्या दिल्या जात होत्या ममता लांडे यांनी विनय आणि विनस शिवतारे यांच्यावर लावला गंभीर आरोप ममता लांडे यांच्या FB पोस्टनंतर विनय शिवतारेंच्या आईनं केला खुलासा

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवतारे यांच्या मुलीनं संपत्तीच्या वादातून दोन भाऊ बाबांना धमकावत असल्याचा आरोप केला आहे. बाबांच्या या दयनीय अवस्थेला तेच जबाबदार आहेत असं मुलगी ममता लांडे शिवतारे यांनी फेसबुक पोस्ट लिहून व्यथा मांडली आहे. लेकीच्या या आरोपानंतर आता विजय शिवतारेंच्या पत्नी मंदाकिनी यांनी खुलासा केला आहे.

मंदाकिनी शिवतारे म्हणाल्या की, गेल्या २७ वर्षापासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून वेगळं राहत आहेत. पहिले ५ वर्ष ते एका महिलेसोबत लग्न करून राहत होते. त्यानंतर आतापर्यंत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहतात. मुलगी ममतानं विनय आणि विनस या दोघांवर केलेले आरोप धांदात खोटे आहेत. उज्ज्वला बागवे या महिलेसोबत विजय शिवतारे यांनी लग्न केले होते. त्यानंतर मिनाक्षी पटेल नावाच्या महिलेसोबत ते पवईला राहतात. यात संपत्तीचा कुठलाही वाद नाही. विजय शिवतारेंच्या मानसिक जाचातून सुटका करून घेणे हे माझं आणि माझ्या कुटुंबाचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितले.

ममता लांडे शिवतारे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट वाचा जशीच्या तशी...

संपत्तीच्या लोभापायी बाबांचा छळ

बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझं भाग्य, मला त्यांनी फुलासारखं जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिलं. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरचं स्थान आहे. माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे. मागील काही दिवसांत फेसबुकवरून होत असलेल्या पोस्टनं आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबित वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण यामुळे माझे भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाला हानी पोहचेल असं त्यांना वाटत होतं व आजही वाटतं असा आरोप विजय शिवतारे यांनी कन्या ममता यांनी फेसबुक पोस्टमधून केला आहे.

तसेच आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय आणि विनस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून घेण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वत: डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा देत पूर्णवेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले. विनयाच्या धमक्यांकडे लक्ष दिलं नाही. मात्र दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. बदनामीच्या धमक्या दिल्या जात होत्या असंही ममता यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना