शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपण कोणाचे खासदार, हाच संभाजीराजेंच्या मनातला संभ्रम : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 19:39 IST

Maratha Reservation Politics Sangli : संभाजीराजे हे राजे आहेत. ते आमचे नेतेसुद्धा आहेत. मात्र, आपण भाजपचे खासदार आहोत का, याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे ते समजतात. मात्र, आजही ते कागदावर भाजपचे खासदार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीही आंदोलन करावे, आम्ही त्यांच्यासोबत राहू. मात्र, आम्हाला चालढकल मान्य नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देआरक्षण आंदोलनात चालढकल मान्य नाही : चंद्रकांत पाटीलराष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे ते समजतात

इस्लामपूर (जि. सांगली) : संभाजीराजे हे राजे आहेत. ते आमचे नेतेसुद्धा आहेत. मात्र, आपण भाजपचे खासदार आहोत का, याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे ते समजतात. मात्र, आजही ते कागदावर भाजपचे खासदार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीही आंदोलन करावे, आम्ही त्यांच्यासोबत राहू. मात्र, आम्हाला चालढकल मान्य नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.पेठनाका येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज्य सरकारला वाचवायचे का मराठा समाजाला, याचा अगोदर विचार करून संभाजीराजेंनी निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी बदललेली भूमिका संशय निर्माण करणारी आहे. पहिल्यांदा कोल्हापुरातून मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यानंतर आमदार-खासदारांना जाब विचारू, असे म्हटले. आमदार-खासदारांना जाब विचारून हा प्रश्न सुटेल का, त्यासाठी सरकारला धारेवर धरावे लागेल.पाटील म्हणाले, आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चे काढण्याचा निर्णय रद्द करून तुम्ही राज्य सरकारला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहात का, हेसुद्धा एकदा कळायला हवे. कधी मूक मोर्चा, तर कधी लाँग मार्च काढण्याची भूमिका घेत या प्रश्नावर चालढकल केली जात आहे, ती आम्हाला मान्य नाही. जे कोणी मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढतील, आंदोलन करतील, त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत.वाघ पिंजऱ्यात असल्याचे त्यांना मान्य!वाघाशी दोस्ती करण्याच्या वक्तव्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील कलगी-तुरा अजूनही सुरू आहे. पिंजऱ्यातल्या वाघाच्या मिशीला हात लावायला या, असे राऊत यांनी म्हटल्याचे पत्रकारांनी सांगताच पाटील म्हणाले, ह्यराऊत असे म्हणत आहेत, म्हणजे वाघ जंगलात नसून पिंजऱ्यात आहे, हे त्यांनी मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राऊत यांचे आभार मानतो.ह्णमराठा, ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीकडून राज्याचा बट्ट्याबोळराज्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, अशीच महाविकास आघाडी सरकारची मानसिकता आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणात या सरकारने राज्याचा बट्ट्याबोळ केला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.पवारांचा पत्ता चुकला !मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्रे पाठविणार असल्याचे सांगितले आहे. हीच पत्रे पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवायला सांगितली पाहिजे होती. त्यामुळे कदाचित त्यांनी लक्ष घातलेही असते. मात्र, पवारांचा पत्ता चुकला असे वाटते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणSangliसांगली