शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती

By admin | Updated: April 23, 2015 00:00 IST

नागपुरातील वाडी नगरपरिषदेच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत तर ७ जागा मिळवित बसपाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला ०४ जागा शिवसेनेला ०२ जागा काँग्रेसला ०१ तर एका अपक्षाला विजय मिळविण्यात यश आले आहे.जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील १८ जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ८ जागा मिळवित सर्वात मोठा ...

नागपुरातील वाडी नगरपरिषदेच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत तर ७ जागा मिळवित बसपाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला ०४ जागा शिवसेनेला ०२ जागा काँग्रेसला ०१ तर एका अपक्षाला विजय मिळविण्यात यश आले आहे.

जळगावमधील वरणगाव नगरपालिकेतील १८ जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ८ जागा मिळवित सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीला ०५ जागा तर शिवसेनेला ०१ आणि अपक्षाला ०४ जागेवर विजय मिळविता आला आहे.

पुण्यातील राजगुरूनगर नगरपरिषदेच्या १६ जागासाठी झालेल्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या अपक्षाच्या हाती लागल्या आहेत. सर्वाधिक ०९ जागेवर अपक्ष विजयी झाले असून भाजपाला ०७ जागा मिळाल्या आहेत.

कुळगाव-बदलापुरातील ४७ जागापैकी शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला २० जागा राष्ट्रवादीला ०२ जागा तर एका अपक्षाला विजय मिळविता आला आहे.

अंबरनाथमधील ५७ जागांपैकी शिवसेनेला २६ जागा भाजपाला १० जागा काँग्रेसला ०८ जागा राष्ट्रवादीला ०५ जागा मनसेला ०२ जागा तर अपक्षाला ६ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी २९ जागा आवश्यक असल्याने अंबरनाथ नगर परीषदेवर भगवा झेंडा फडकणार हे निश्चित आहे.

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकासोबतच भोकर नगर परीषदेची निवडणूक पार पडली. भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असल्यानं त्याकडं लक्ष लागलं होतं. बालेकिल्ला राखण्यात अशोक चव्हाण यांना यश आलं आहे. १९ जागा असलेल्या भोकर नगर परीषदेत काँग्रेसला १२ जागा राष्ट्रवादीला ०३ भाजपाला ०२ तर अपक्षाला २ जागा मिळाल्या. १२ जागा मिळाल्यानंतरही आपण समाधानी नसल्याचं चव्हाण यांनी म्हटंलं आहे.

औरंगाबादमध्ये अनेक वर्षापासून असलेली सत्ता शिवसेनेने कायम राखण्यात यश मिळवले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या "एमआयएम"ने २५ जागेवर विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली. तर बसलाला ५ जागा मिळविण्यात यश आले. शिवसेना ३५ एमआयएम २५ भाजप २३ काँग्रेस १० आरपीआय डेमोक्रॅटिक १ तर इतर १२ जागेवर विजयी झाले आहेत.

नवी मुंबईतील १११ जागेसाठी झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले असले तरी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसची तसेच अपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला ५३ जागा शिवसेनेला ३७ जागा काँग्रेसला १० जागा भाजपला ०६ जागा तर अपक्षाला ५ जागांवर विजय मिळविता आला आहे.