शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

Param bir Singh: बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम; नवाब मलिकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 08:54 IST

Param bir Singh will Expose soon By NCP: नवाब मलिक यांनीदेखील देशमुख पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याचे आणि पत्रकार परिषद घेतल्याचा भाजपाचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आरोप करत आहेत, ते खोटे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हवा काढली होती. परमबीर सिंगांनी (Param Bir Singh) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पोलीस अधिकारी भेटल्याची वेळ चुकीची होती. देशमुख तेव्हा क्वारंटाईन होते, असे पवार म्हणाले होते. आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी परमबीर यांच्यावर आरोप केले आहेत. (We know who Param Bir Singh met in Delhi, will disclose at the right time, says Nawab Malik)

Param Bir Singh: परमबीर सिंगांनी स्वीकारली नवी जबाबदारी; 100 कोटींच्या लेटर बॉम्बचे दिल्लीपर्यंत पडसाद

नवाब मलिक यांनीदेखील देशमुख पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याचे आणि पत्रकार परिषद घेतल्याचा भाजपाचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आरोप करत आहेत, ते खोटे आहेत. अनिल देशमुखांना 15 फेब्रुवारीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, तेव्हा हॉस्पिटलबाहेर काही पत्रकार होते. त्यांना देशमुखांशी बोलायचे होते. देशमुखांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी एक खूर्ची घेतली आणि तिथे बसले, तेव्हा पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला, असे मलिक म्हणाले. 

Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य 

देशमुखांनी कोणतीही पत्रकार परिषद बोलावली नव्हती. त्यांनी चार्टर्ड फ्लाईटने मुंबई गाठली आणि घरी 27 तारखेपर्यंत क्वारंटाईन झाले. परमबीर सिंगांनी केलेले आरोप आणि सीबीआय चौकशीची मागणी यावर मलिक म्हणाले की, जेव्हापासून त्यांची बदली झाली आहे, तेव्हापासून ते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. ते असे का करत आहेत ते आम्हालाही माहिती आहे. ते दिल्लीला गेलेले. तिथे ते कोणाला भेटले हे देखील आम्हाला माहिती आहे. आम्ही योग्य वेळ आल्यावर सांगणार आहोत. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, करेक्ट वेळेवर सारे उघड केले जाईल, असे मलिक म्हणाले. 

आरोप काय होते?सचिन वाझे (Sachin Vaze)  प्रकरण आता चांगलेच तापले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरणातून पुढे वेगळेच वळण मिळाले आहे. सचिन वाझेंची नियुक्ती कोणी केली ते मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांची अक्ष्यम्य चुकांमुळे उचलबांगडी या साऱ्या प्रकरणांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी  (Param Bir Singh) महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगnawab malikनवाब मलिकSharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझे