शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोण जिंकणार, कोण हरणार? हे वेळ सांगेल; महापौर किशोरी पेडणेकर यांचा ‘प्रहार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:35 IST

Kishori Pednekar : नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, कोणतीच निवडणूक सोपी आहे असे आम्ही कधीच म्हटले नाही.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार? हे वेळ सांगेल. इतरांनी हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांचे नाव न घेता ‘प्रहार’ केला. हा जनआशीर्वाद नाही, तर जन छळवणूक आहे, अशी टीकादेखील महापौरांनी केली.

नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, कोणतीच निवडणूक सोपी आहे असे आम्ही कधीच म्हटले नाही. कारण दर निवडणुकीला इतिहास आणि भुगोल वेगळा असतो. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आमचा फोकस ठरला आहे. कोणावर टीका करण्यापूर्वी आपण आपला प्रवास बघितला पाहिजे. आपल्याला अशी टीका करण्याचा अधिकार कोणी दिला? याचा विचार केला पाहिजे.

नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळ दाखल होत दर्शनही घेतले. यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, बाळासाहेब आमचे ऊर्जास्थान आहे. शक्तिस्थान आहे. आमच्या घरी येऊन जर का कोणी नतमस्तक होत असेल तर आम्ही आमच्या संस्कृतीप्रमाणे वागणार. बाळासाहेबांनी शिकवले आहे की घरात आलेल्याला हाकलवयाचे नसते. उशिरा का होईना देहरूपी नसले तरी हे सगळे विचारात भिणले आहे हे त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. कोणी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होत असेल तर आम्हाला आनंद आहे. यात राजकारण करण्याची गरज नाही.

मुळात आपण जनतेला गृहित धरू नये. आज आपण एका वेगळ्या टप्प्यातून जात आहोत. कोरोनासारखा काळ आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. हे मी म्हणत नाही. आरोग्यतज्ज्ञ म्हणत आहेत. आपण ऐकले पाहिजे. 

टॅग्स :Kishori Pednekarकिशोरी पेडणेकरNarayan Raneनारायण राणे