शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

जागा कुणाला, काँग्रेस की राष्ट्रवादी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:34 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सहा महिन्यांपूर्वीच झाली.

- अंकुश गुंडावारभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सहा महिन्यांपूर्वीच झाली. त्यानंतर आता पुन्हा दोन महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पोटनिवडणुकीतीलच उमेदवार रिंगणात राहणार की नवीन चेहरे पाहायला मिळणार, याकडे दोन्ही जिल्ह्यांतील मतदारांचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणुकीत मिळालेले यश कायम ठेवण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसचा दम लागणार आहे. तर भाजपा पुढे पुन्हा यश खेचून आणण्याचे आव्हान आहे.या मतदारसंघाचा इतिहास पाहता एक खासदार लागोपाठ दुसऱ्यांदा निवडून येत नाही. ही पंरपरा मागील २० वर्षांपासून आहे. यंदाही ही परंपरा कायम राहील का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या लोकसभा मतदार क्षेत्रात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २०१४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नाना पटोले लढले व ते विजयी झाले होते.त्यानंतर चार वर्षांनी पटोले यांनी भाजपाला रामराम ठोकत खासदारकीचा राजीनामा दिल्याने सहा महिन्यापूर्वी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस व पिरिपाचे उमेदवार मधुकर कुकडे ४२ हजार मतांनी विजयी झाले, तर भाजपचे जिल्ह्याध्यक्ष हेमंत पटले यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मतदार संघाचे समीकरण पुन्हा बदलले आहे. पुन्हा २ महिन्याने लोकसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. यासाठी अद्यापही कोणत्याही पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची अधीकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांच्या नावांबाबत दोन्ही जिल्ह्यातील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.राष्टÑवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल व विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून माजी खा. नाना पटोले, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. सेवक वाघाये यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपकडून आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, माजी आमदार हेंमत पटले, माजी खासदार खुशाल बोपचे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, अ‍ॅड. रवी वाढई यांची तर बसपाकडून संजय नासरे, राजेश नंदूरकर यांची नावे चर्चेत आहे.>राजकीय स्थिती२०१४ मध्ये भाजपने राष्टÑवादीच्या हातून ही जागा खेचून घेतली होती. मात्र २०१८ च्या पोटनिवडणुकीत कॉग्रेस-राष्टÑवादी व पीरिपा आघाडीने पुन्हा भाजपाकडून ही जागा खेचून आपले वर्चस्व स्थापन केले.>विधानसभेतील राजकीय चित्रभंडारा-भाजपतुमसर-भाजपसाकोली-भाजपगोंदिया - काँग्रेसतिरोडा-गोरेगाव- भाजपअर्जुनी मोरगाव-भाजप>२०१४ मध्ये मिळालेली मते6,06,129नाना पटोले(भाजप)(५०.६२%)4,56,875प्रफुल्ल पटेल(काँग्रेस-रॉका) (३८.१६%)>२०१८ मध्ये मिळालेली मते4,42,213मधुकर कुकडे(काँग्रेस-रॉका-पिरिपा) (४६.६१%)3,94,116हेमंत पटले(भाजपा) (४१.५४%)>हे मुद्दे प्रभावशाली : लगतच्या छत्तीसगड राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच त्यांनी कर्जमाफी केली. प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात काही मोठे उद्योग सुरू झाले, मात्र गेल्या साडेचार वर्षांत साधी वीटभट्टीही सुरू झाली नाही. त्यामुळे बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न आणि विकास हेच मुद्दे प्रभावी ठरतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nana Patoleनाना पटोले