शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा नवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कोण? राहुल गांधींची 'या' नावांना पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 05:59 IST

Congress News: शनिवारी काँग्रेसच्या तामिळनाडू शाखेचे पुनर्गठन करण्यात आले. तामिळनाडूत पक्षाला फारसा जनाधार नाही. तथापि, दक्षिणेतील केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांच्या नेमणुकांवरून जोरदार संघर्ष सुरू आहे.

शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल सुरू असताना पक्षातील मतभेद समोर येत आहेत. ग्रुप-२३ मध्ये सहभागी नेत्यांनी संघटनात्मक निवडणुकीची मागणी धरलेली असतानाही पक्ष नेतृत्व विभिन्न राज्यांत नेमणुका करीत आहे.

शनिवारी काँग्रेसच्या तामिळनाडू शाखेचे पुनर्गठन करण्यात आले. तामिळनाडूत पक्षाला फारसा जनाधार नाही. तथापि, दक्षिणेतील केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांच्या नेमणुकांवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. स्वत: राहुल गांधी खासदार असलेल्या केरळात मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्या जागी दुसरा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची मागणी पक्षातून होत आहे. तथापि, रामचंद्रन यांना हटविले जाणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. राज्याचे प्रभारी तारिक अन्वर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

तेलंगणात उत्तम रेड्डी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रेवंत रेड्डी यांना आणण्यासाठी के.सी. वेणुगोपाल यांनी शक्ती पणाला लावली आहे. दुसऱ्या गटास मात्र रेवंत रेड्डी नको आहेत. ते चंद्राबाबूंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. रेवंत रेड्डी यांची नेमणूक केल्यास पक्षात फूट अटळ असल्याचे एका नेत्याने सांगितले.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी यांची नावे चर्चेतमहाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्यास बसविण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे. राजीव सातव, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. यावर निर्णय मात्र अजून झालेला नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस