शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

"राणे जिथे जातात, तेथील सत्ता जाते", दीपक केसरकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 23:23 IST

Deepak Kesarkar : फडणवीसांच्या काळात कर्जमाफीला दोन वर्ष लागली. मात्र महाविकास आघाडीने हे काम २ महिन्यात केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी याची दखल जागतिक आरोग्य पातळीवर घेण्यात आल्याचे केसरकर म्हणाले.

ठळक मुद्दे'राणेंची त्या ढोलकी वाल्या उंदरा सारखी परिस्थिती झाली आहे. ''जिथे राणे जातात तेथील सत्ता जाते, असा आता पर्यंतचा इतिहास आहे'

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे सध्या रिकामी आहेत. त्यामुळेच ते काही बोलतात. राणे जेवढे बोलतील तेवढे भाजपाच्या लोकांमधील स्थान कमी होत जाईल. पक्षच बदनाम होणार असून, जिथे राणे जातात तेथील सत्ता जाते, असा आता पर्यंतचा इतिहास आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. ते शुक्रवारी रात्री उशिरा सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते.

केसरकर म्हणाले, ज्या मुख्यमंत्र्यांचे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत कौतुक केले आहे. मग राणेंची टीकेची नोंद कोण घेणार? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद दिले होते. त्यांनाही हयातीत त्रास देण्याचे काम राणे यांनी केले आहे. राणेंवर संपत्ती बद्दल न्यायालयात खटले सुरु आहेत. त्यांच्या एका मुलावर खंडणीचा तर दुसऱ्या मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. राणेंची त्या ढोलकी वाल्या उंदरा सारखी परिस्थिती झाली आहे. 

याचबरोबर, राणे सध्या मुख्यमंत्र्यावर बोलत आहेत. मात्र कारवाई झाली की ते कांगावा करणार आपण बोललो म्हणून कारवाई केली. राणे मुख्यमंत्र्यांवर बोलून कारण शोधू लागले आहेत, असे म्हणत केसरकर यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. फडणवीसांच्या काळात कर्जमाफीला दोन वर्ष लागली. मात्र महाविकास आघाडीने हे काम २ महिन्यात केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी याची दखल जागतिक आरोग्य पातळीवर घेण्यात आल्याचे केसरकर म्हणाले. 

नगरसेवकांचे काय नगराध्यक्षांनाही आपले पद गमवावे लागेलसावंतवाडी शहरात नव्याने उभारण्यात आलेले स्टॉल तसेच अन्य अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात येतील, हे स्टॉल उभे राहताना त्यांना रोखण्याची मुख्याधिऱ्यांची जबाबदारी होती. त्यामुळे ते कारवाईस पात्र आहेत आणि अशा बेकायदेशीर स्टॉलना कोणी 'प्रोटेक्ट' करत असेल तर नगरसेवकच काय नगराध्यक्षांवर सुद्धा अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा सज्जड इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्ग