शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला २२ जागा दिल्यास आम्ही काय करायचे? विरोधी पक्षनेत्यांचा सवाल

By अतुल कुलकर्णी | Updated: March 6, 2019 06:45 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करायचीच नाही, पण आपण आघाडी करतोय असे दाखवायचे या हेतूने प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचे प्रतिनिधी मंगळवारी बैठकीस आल्याचे स्पष्ट झाले.

- अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करायचीच नाही, पण आपण आघाडी करतोय असे दाखवायचे या हेतूने प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचे प्रतिनिधी मंगळवारी बैठकीस आल्याचे स्पष्ट झाले. आम्हाला २२ जागा हव्या आहेत, अशी मागणी या आघाडीकडून लक्ष्मण माने यांनी केली. मात्र तुम्हाला २२ जागा द्यायच्या, राजू शेट्टी यांना दोन जागा द्यायच्या, अन्य मित्रपक्षांना एक-दोन जागा दिल्यावर शिल्लक राहणाऱ्या दहा-बारा जागा आम्ही वाटून घ्यायच्या का, असा सवाल बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.बैठकीची सुरुवातच अशी झाल्यानंतर पुढे बैठकीला सूर लागलाच नाही. तुम्हाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलून घेऊ, असे खासदार चव्हाण म्हणाले. बैठकीतूनच प्रकाश आंबेडकर यांना फोन लावण्यात आला. त्यांनी जागावाटपाची चर्चा राहुल गांधी यांच्याशीच करू असे सांगितले. मात्र तुम्ही २२ जागा मागत आहात, असा प्रस्ताव घेऊन आम्ही गांधी यांच्याकडे जायचे का, असा सवालही या वेळी खा. चव्हाण यांनी केला. जागांची चर्चा आमच्यासोबतच करावी लागेल, त्यातून मार्ग काढून अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊ, असेही ते म्हणाले. पण आम्ही तर २२ जागा जाहीर करून बसलोय, असे लक्ष्मण माने यांचे म्हणणे होते.बहुजन वंचित आघाडी २२ जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागा मागत आहे. आमची मनापासून इच्छा आहे की आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे, ज्याअर्थी त्यांनी या तीन जागा मागितल्या याचा अर्थ ते आमच्याशी चर्चा करायला तयार आहेत, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. लक्ष्मण माने म्हणाले, मसुदा काय असावा यावर चर्चा झाली आहे, मात्र अंतिम निर्णय व्हायचा आहे. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होईल. आम्ही २२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या २२ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. या ताठरतेमुळे मंगळवारची बैठक कोणतीही चर्चा न होता संपली.बैठकीस खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हुसेन दलवाई, राष्टÑवादीतर्फे जितेंद्र आव्हाड, शिवाजीराव गर्जे, तर वंचित आघाडीतर्फे लक्ष्मण माने, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, आनंद यादव, भारिप बहुजन महासंघाचे अशोक सोनवणे यांची उपस्थिती होती.>शेवटपर्यंत नावे दिलीच नाहीतदोन्ही काँग्रेस पक्ष आरएसएसच्या विरोधात आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी तुम्हीच मसुदा तयार करा, अशी मागणीही लक्ष्मण माने यांनी केली. त्यावर तुम्ही तुमचे दोन सदस्य द्या, आम्ही आमच्याकडून दोन सदस्य देतो, सगळे मिळून चर्चा करून मसुदा तयार करतील, असे खा. चव्हाण म्हणाले. यावर बोलण्यास ज्येष्ठ विधिज्ञ माजिद मेमन आणि अ‍ॅड. गजानन देसाई यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते. मात्र समितीचा मसुदा तुम्हीच आधी तयार करून पाठवा, मग आम्ही आमचे मत देऊ, असे सांगत माने यांनी वंचित आघाडीच्या वतीने शेवटपर्यंत नावे दिली नाहीत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Ashok Chavanअशोक चव्हाण