शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

West Bengal Election : ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत; निरीक्षकांनी पाठवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 21:30 IST

West Bengal Election : बुधवारी ममता बॅनर्जींच्या पायाला झाली होती दुखापत. चार पाच जणांनी हल्ला केल्याचा ममता बॅनर्जी यांनी केला होता दावा.

ठळक मुद्देबुधवारी ममता बॅनर्जींच्या पायाला झाली होती दुखापत.चार पाच जणांनी हल्ला केल्याचा ममता बॅनर्जी यांनी केला होता दावा.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्यावर हल्ला झाला असल्याचा दावा केला होता. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. निवडणूक आयोगानं विवेक दुबे आणि अजय नायक यांना अहवाल सोपवण्याचे आदेश दिले होते. चार पाच लोकांनी आपल्यावर हल्ला केला होता असा दावा पायाला झालेल्या दुखापतीनंतर ममता बॅनर्जी यांनी केला होता.निरीक्षकांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्याच्या शक्यता नाकारल्या असल्याचं अहवालात म्हटल्याचं इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. 'आम्हाला ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ज्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते,' असं त्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शनिवारी निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल सरकारचा अहवाल अपूर्ण असल्याचं म्हणत मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना रविवारपर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर निवडणूक आयोगानं दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. स्पेशल पोलीस ऑब्झर्व्हर विवेक दुबे आणि स्पेशल ऑब्झर्व्हर अजय नायक यांनी शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली. तसंच यानंतर निवडणूक आयोगाला आपला अहवाल पाठवून दिला. पश्चिम बंगाल सरकारनं दिलेल्या माहितीनुसार नंदीग्राम येथे १० मार्च रोजी ममता बॅनर्जी यांना गाडीच्या दरवाज्यामुळे दुखापत झाली. परंतु त्यांच्या पायाला गाडीचा दरवाजा कसा लागला याबाबत मात्र माहिती देण्यात आली नव्हती. सरकारच्या या अहवालात ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत कशी झाली याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं निवडणूक आयोगाला दिसून आलं. व्हिलचेअरवरून प्रचार करणारनंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. प्रसंगी व्हीलचेअरवरून प्रचार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ममता बॅनर्जी यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या रक्तातील सोडियमचं प्रमाण कमी झालं आहे. त्यांच्या डाव्या घोट्याला तसेच उजवा खांदा, हात, गळा व मानेलाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्या पायाला प्लॅस्टर घातलं आहे, असं डॉक्टरांनी यापूर्वी सांगितलं होतं. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण