शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election : काँग्रेस नेतृत्व इटलीचं, कम्युनिस्ट विचार रशिया-चीनचे आणि दीदींचे मतदार घुसखोर; अमित शाहंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 16:58 IST

अमित शाहंनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा, ममता बॅनर्जींचे मतदार घुसखोर, अमित शाहंची टीका

ठळक मुद्देअमित शाहंनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा ममता बॅनर्जींचे मतदार घुसखोर, अमित शाहंची टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, दार्जिलिंग येथे आयोजित एका रॅलीदरम्यान अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी यावेळी तृणमूल काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "दीदी (ममता बॅनर्जी) मला बाहेरील म्हणतात. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरील संबोधतात. पण मी सांगतो बाहेरील कोण आहेत. कम्युनिस्ट विचारसरणी बाहेरील आहे. ती रशिया आणि चीनमधून आली आहे. काँग्रेसचं नेतृत्व बाहेरील असून ते इटलीमधून आलं आहे. तृणमूल काँग्रेसची व्होटबँक बाहेरील असून घुसखोर आहेत," असं म्हणत शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. इतकंच नव्हे तर दार्जिलिंगमध्ये गोरखा समाजाला शुभेच्छा देताना अमित शाह यांनी भाजप आपल्या सन्मानासाठी कोणाशीही लढायला तयार असल्याचं म्हटलं. "गोरखा आणि नेपाळी बांधवांनो जर कोणी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरू नका. गोरखा आणि नेपाळी समाजाच्या सन्मानासाठी भाजप कोणाशीही लढू शकते," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी गोरखा समुदाच्या ११ जातींना एसटी प्रवर्गाचा दर्जा देण्याचंही आश्वासन दिलं. दरम्यान, ममता बॅनर्जी यांना हटवून भाजपचा मुख्यमंत्री निवडा, पक्ष गोरखा समजातील ११ जातींना एसटीचा दर्जा देईल, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी १९८६ च्या घटनेचा उल्लेख केला. "कम्युनिस्टांनी टेकड्यांवर आग लावली होती. त्यात गोरखा समाजातील १२०० जणांचा मृत्यू झाला होता. ममता बॅनर्जींनीही काही केला नाही. अनेकांचा मृत्यू झाला होता. हजारो लोकांविरोधात एफआयआर दाखल झाला होता. परंतु त्या एफआयआरमधून काही जणांचं नाव काढून टाकण्यात आलं. भाजप सरकार तयार झाल्यानंतर आठवड्यातभरात त्यांची नावं पुन्हा घेण्यात येतील," असंही शाह यावेळी म्हणाले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया