शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 08:35 IST

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींकडे त्यांच्या वक्तव्यावर मागितलं होतं स्पष्टीकरण

ठळक मुद्देनिवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींकडे त्यांच्या वक्तव्यावर मागितलं होतं स्पष्टीकरणहिंदू मुस्लीम मतांच्या विभाजनाविरोधात कायम बोलणार, ममता बॅनर्जी आक्रमक

मुस्लीम मतदारांनी एकत्र येण्याचं आवाहन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली होती. दरम्यान यावर ममता बॅनर्जी आक्रमक झाल्याचं पाहायवा मिळालं. "धर्माच्या आधारावार मतांचं विभाजन करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाच्या विरोधात आपण आवाज उठवत राहू. निवडणूक आयोगानं १० नोटीसा जरी पाठवल्या तरी आपला दृष्टीकोन बदलणार नाही," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. "निवडणूक आयोग हवं तर मला १० नोटीसा पाठवू शकतो. परंतु त्याचं उत्तर एकच असणार आहे. मी कायम हिंदूमुस्लीम मतांच्या विभाजनाच्या विरोधात बोलत राहणार. मी धर्माच्या आधारावर मतदारांचं विभाजन करण्याच्या विरोधात उभी राहिन," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात हिंदू व मुस्लिमांच्या व्होटबँकेचा उल्लेख करतात त्या वेळी त्यांच्याविरोधात कुठलीच तक्रार का दाखल होत नाही?, असा सवाल ममता यांनी केला. नंदिग्राममध्ये निवडणूक असताना काही नेत्यांनी ‘मिनी पाकिस्तान’ या शब्दाचा उपयोग केला होता. त्यांच्याविरोधात किती तक्रारी दाखल झाल्या?, असा सवाल त्यांनी आयोगाला केला.निवडणूक आयोगानं मागितलं होतं स्पष्टीकरणनिवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना ३ एप्रिल रोजी दिलेल्या आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. आपल्या मतांचं निरनिराळ्या पक्षांमध्ये विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम मतदारांना केलं होतं. तक्रारीनुसार त्यांनी धर्माच्या आधारे तृणमूल काँग्रेससाठी मत मागितलं होतं. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMuslimमुस्लीमHinduहिंदूVotingमतदान