शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

West Bengal Election : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल; म्हणाले,"बेगम ममता बॅनर्जी पश्चिम बंगालला बनवतील मिनी पाकिस्तान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 09:12 IST

West Bengal Election 2021 : सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.

ठळक मुद्देसुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत.यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. सोमवापी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर पलटवार केला. "ममता बॅनर्जी यांना ईद मुबारक म्हणण्याची सवय आहे. म्हणून त्यांनी होळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी होली मुबारक असं म्हटलं. बेगमना मतदान करू नका. जर तुम्ही त्यांना मतदान केलं तर पश्चिम बंगाल मिनी पाकिस्तान बनेल. बेगम अचानक बदलल्या आहेत आणि त्या आता मंदिरात जाऊ लागल्या आहेत, कारण त्यांना पराभवाची भीती आहे," असं म्हणत अधिकारी यांनी निशाणा साधला."जे लोकं आज या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आले आहेत ते बाहेरून आले आहेत आणि या ठिकाणी तात्पुरते राहिले आहेत. निवडणुकीनंतर ते उडून जातील. परंतु आपण या ठिकाणचे स्थायी निवासी आहोत आणि लोकांच्या सुख दु:खासाठी काय उपलब्ध असू," असं अधिकारी म्हणाले.  ममता बॅनर्जी यांची एक कथित ऑडिओ क्लिप लीक झाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. "ऑडिओमध्ये ऐकू शकतो. त्या नंदीग्राममध्ये पहिलेही येत नव्हत्या आणि नंतरही येणार नाहीत. अशात त्या सातत्यानं खोटं बोलत आहेत की नंदीग्रामच्या लोकांसाठी त्या कायम उपलब्ध असतील. परंतु त्या नंदीग्राममध्ये कधी येणार नाहीत हे सत्य आहे," असंही ते म्हणाले. ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. शाह यांच्या या दाव्यावरून ममता बॅनर्जी यांनी शाह यांना टोला लगावला आहे. चंदीपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामं करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी