शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

भाजपच्या गोटात ममता बॅनर्जींचा सर्जिकल स्ट्राईक; खासदाराची पत्नी तृणमूलमध्ये

By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 3:08 PM

west bengal assembly election: बंगालमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू; भाजप-तृणमूलमध्ये जोरदार चढाओढ

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. गृहमंत्री अमित शहांनी नुकताच राज्याचा दौरा केला. या दरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.भाजपनं तृणमूलचे अनेक आमदार गळाला लावल्यानंतर आता तृणमूलनं भाजपच्या घरात सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी आज तृणमूलमध्ये प्रवेश केला. सौमित्र लोकसभेत बिशुनपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. आपण पत्नीच्या तृणमूल प्रवेशाबद्दल अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 'माझ्याशी कोणताही संवाद न साधता पत्नीनं हा निर्णय घेतला,' असं खान म्हणाले. पती भाजपचे खासदार असताना तृणमूलमध्ये प्रवेश करणाऱ्या सुजाता यांना पत्रकारांनी याबद्दलच विचारताच घरातल्या गोष्टी घरातच राहू द्या, असं उत्तर त्यांनी दिलं. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूलचे खासदार सौगत रॉय आणि प्रवक्ते कुणाल घोष उपस्थित होते. 'भाजपमध्ये मला कधीही सन्मान मिळाला नाही. लोकप्रियतेबद्दल बोलायचं झाल्यास ममता बॅनर्जी यांच्या आसपासदेखील कोणी नाही,' असं सुजाता म्हणाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि सौमित्र खान यांच्यात काही दिवसांपूर्वी खटके उडाले होते.

एका बाजूला भाजपनं विधानसभेसाठी आक्रमकपणे तयारी सुरू असताना निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचं भाकीत केलं आहे. 'पश्चिम बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडताना भाजपला संघर्ष करावा लागेल. भाजपचं समर्थन करणारा माध्यमांमधला गट त्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देत आहे,' असं प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझं ट्विट सेव्ह करून ठेवा. भाजपनं दुहेरी आकडा ओलांडल्यास ट्विटर सोडेन, असंदेखील किशोर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. प्रशांत किशोर यांच्या ट्विटला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून किशोर यांना खोचक टोला लगावला आहे. 'पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी सुरू आहे. सत्तांतर झाल्यावर देश एका निवडणूक रणनीतीकाराला मुकेल,' अशा शब्दांत विजयवर्गीय यांनी पलटवार केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोर